उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अष्टविनायकापैकी एक असणाऱ्या मोरगावच्या श्री मयुरेश्वराचे सपत्निक मनोभावे दर्शन घेतले.
2 / 7
राज्यासमोरील सर्व संकट दूर व्हावीत, सर्वदूर पाऊस पडावा, राज्यातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनता सुखी व्हावी, असं साकडं श्री मयुरेश्वराच्या चरणी घातलं.
3 / 7
राष्ट्रवादीमध्ये बंड करून भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार बारामध्ये आज आले आहेत.
4 / 7
त्यामुळे त्यांचं यावेळी जंगी स्वागत आणि मिरवणुक काढण्यात आली. तसेच त्यांनी यावेळी देखील घेतली आहे.
5 / 7
यावेळी अजित पवारांसह त्यांच्या कुटुंबातील पत्नी सुनेत्रा पवार, भाऊ श्रीनिवास पवार, मुलं पार्थ पवार आणि जय पवार देखील उपस्थित असणार आहेत.
6 / 7
तर बारामतीमध्ये मात्र कार्यकर्ते अजित पवार आणि सुप्रीया सुळे दोघांनाही पाठींबा देत आहेत.
7 / 7
कारण या कार्यकर्त्यांच्या मते पक्षात जरी फुट पडली असली तरी या कुटुंबात मात्र फुट पडलेली नाही.