अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री वेडिंग, खास विधीचे पाहा फोटो
letsupteam
Anant Ambani Radhika Merchant
देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचा विवाह राधिका मर्चंटसोबत होणार आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी, अनंत अंबानी आणि त्यांची भावी पत्नी राधिका यांनी स्वत:च्या हातांनी लोकांना जेवण वाढले.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाआधी गुजरातच्या जामनगरमध्ये प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू झाले आहेत.
या वर्षी जुलैमध्ये दोघेही लग्न करणार आहेत. प्री-वेडिंगची सुरुवात अंबानी कुटुंबाच्या अन्न सेवा या विशेष विधीने झाली.
सुमारे 51 हजार स्थानिक रहिवाशांना अन्न सेवा दिली जाणार आहे. हा कार्यक्रम पुढील काही दिवस सुरू राहणार आहे.
अंबानी कुटुंबात अन्न सेवेची परंपरा खूप जुनी आहे. कोणत्याही शुभ प्रसंगी अन्न सेवा करुन सुरुवात करतात.
कौटुंबिक परंपरेला पुढे नेत अनंत अंबानी यांनी त्यांच्या लग्नाआधीची कार्ये अन्न सेवेसोबत सुरू केली आहेत.