Anant Radhika ला लागली हळद! राधिका मर्चंटच्या मोगऱ्याच्या ओढणीने वेधले लक्ष, पाहा फोटो
Anant Radhika मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्याची लगबग सुरू आहे. नुकताच त्यांचा खास हळदी समारंभ पार पडला.
shruti letsupp
Anant Radhika
मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्याची लगबग सुरू आहे.
नुकताच त्यांचा खास असा हळदी समारंभ पार पडला.
या सोहळ्यामध्ये हळदीच्या रंगात रंगलेलं अनंत आणि राधिका या जोडप्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं
राधिका मर्चंटने पिवळ्या रंगाचा खास पोशाख परिधान केला होता. ज्यावर तिने मोगऱ्याच्या फुलांची ओढणी घेतली होती.
ओढणीसह राधिकाचे दागिने देखील फुलांपासून बनवलेले होते. तर अनंत अंबानीने पिवळ्या रंगाचा खास पारंपारिक ड्रेस परिधान केला होता.
अनंत आणि राधिकाच्या लग्नाच्या फंक्शन्सबद्दल बोलायचे तर ते 12 जुलैपासून सुरू होणार आहेत. 12 जुलै रोजी शुभ विवाह होणार आहे.
त्यानंतर 13 जुलै हा शुभ आशीर्वादाचा दिवस असेल. या दिवशी लोक नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी येतील.
यानंतर 14 जुलै रोजी मंगल उत्सव किंवा लग्नाचे स्वागत समारंभ होणार आहे. या तीन दिवसांत जगभरातील प्रसिद्ध व्यक्ती या सोहळ्याला येणार आहेत.