सोन्या-चांदीचं नक्षीकाम अन् मंत्रघोष जाणून घ्या अनंत-राधिकाच्या लग्नपत्रिकेच्या खास गोष्टी

सोन्या-चांदीचं नक्षीकाम अन् मंत्रघोष जाणून घ्या अनंत-राधिकाच्या लग्नपत्रिकेच्या खास गोष्टी

Anant-Radhika Wedding Card specialty : गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Anant-Radhika) यांचा विवाह सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपलाय. या विवाह सोहळ्याच्या प्रत्येक गोष्टीची जगभरात चर्चा झाली. त्याला या विवाह सोहळ्याची पत्रिका (Wedding Card) देखील अपवाद नाही. अनंत आणि राधिकाच्या खास लग्न पत्रिकेने सध्या सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतलं आहे. काय आहे या लग्न पत्रिकेची खासियत? पाहुयात….

लोकसभा गाजली पण, PM पदाची खुर्ची हुकली; 14 विरोधी पक्षनेत्यांपैकी एकालाच संधी

अंबानी कुटुंबामध्ये या विवाह सोहळ्याच्या लगबगी दरम्यान आता निमंत्रितांना लग्न पत्रिका दिल्या जात आहेत. त्या अगोदर ही पत्रिका वाराणसीच्या काशी काशीविश्वेश्वरासह इतर देवी देवतांना अर्पण करण्यात आली. सोनेरी रंगाच्या बॉक्समध्ये असलेली ही पत्रिका उघडताच चतुर्भुज स्वरूपात भगवान विष्णूंचा फोटो असून वैदिक मंत्रांचा जयघोष ऐकु येतो. तर चांदीच्या डब्यामध्ये विवाह सोहळ्यातील विविध कार्यक्रमांची पत्रिका देण्यात आली आहे.

तसेच चांदीच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पा, माता दुर्गा, राधाकृष्ण, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या सुवर्ण प्रतिमा पाहायला मिळतात. तर विवाह सोहळ्याच्य वेगवेगळ्या कार्यक्रमांचे वेगवेगळे निमंत्रण पत्र आहेत. तसेच निमंत्रितांसाठी काही भेटवस्तू देखील ठेवण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये चांदीची पेटी अनंत आणि राधिकाच्या नावाचे अद्याक्षर एआर लिहिलेला एक कपडा, निळी शॉल यांचा समावेश आहे.

अधिवेशनाचा आज दुसरा दिवस; संयमी नेते बाळासाहेब थोरात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक

सोमवारी ही अत्यंत खास अशी लग्नपत्रिका स्वतः नीता अंबानी यांनी काशी विश्वनाथ मंदिरात अर्पण केली. त्याचबरोबर विशालाक्षी मंदिरात ही लग्नपत्रिका अर्पण केल्यानंतर महंत सुरेश कुमार तिवारी यांनी सांगितले की, आत्तापर्यंत अशी अद्भुत लग्नपत्रिका पाहिली नाही. परिसरात या लग्नपत्रिकेची प्रचंड चर्चा सुरू आहे. ही पत्रिका पाहण्यासाठी लोकांनी रांगाच्या रांगा लावल्या आहेत. यावरूनच या लग्नपत्रिकेची खासियत लक्षात येते.

तर अगोदर मार्चमध्ये अनंत आणि राधिकाच्या विवाह सोहळ्याचं भव्य प्री-वेडिंग फंक्शन एक गुजरातमध्ये तर दुसरं इटलीतील एका आलिशान क्रूजवर पार पडलं. तर आता 12 जुलैला हे जोडप विवाह बंधनात अडकणार आहे. त्यानंतर 13 जुलैला आशीर्वाद सोहळा आणि 14 जुलैला ग्रँड रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज