अरुणा इराणी, मिथुन चक्रवर्ती अन् हेलन यांना मुख्यमंत्र्यांकडून ‘स्व. राज कपूर जीवनगौरव’पुरस्कार प्रदान
shruti letsupp
Raj Kapoor Life Time Achivement Award
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अरुणा इराणी, मिथुन चक्रवर्ती अन् हेलन यांना‘स्व. राज कपूर जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ज्येष्ठ अभिनेत्री, निर्माती श्रीमती अरुणा इराणी यांना सन २०२० या वर्षासाठीचा ‘स्व. राज कपूर जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तर ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना सन २०२१ या वर्षासाठीचा स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मिथुन चक्रवर्ती यांच्यावतीने त्यांचे स्नेही विजय यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांना सन २०२२ च्या स्व. राज कपूर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.