Devendra Fadnavis : परकीय गुंतवणूक राज्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शनिवारी मध्यरात्री दावोसच्या दौऱ्यावर गेले.
2 / 7
फडणवीस दाओसच्या दौऱ्यावर असताना झ्युरिक येथील मराठी भगिनींनी आणि बांधवांनी मराठमोळ्या पद्धतीने त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले.
3 / 7
झ्युरिक येथील मराठी भगिनींनी फडणवीस यांचे औक्षण करून दावोसमध्ये स्वागत केलं.
4 / 7
यावेळी फडणवीसांनी सर्वांची आस्थेने विचारपूस करत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.
5 / 7
यावेळी चिमुकल्यांनीही देवेंद्र फडणवीस यांचे चित्र साकारले होते. त्यांचं फडणवीसांनी कौतूकं केलं.
6 / 7
यानंतर फडणवीस यांना सोशल मीडियावर एक पोस्ट करत झ्युरिक येथील मराठी भगिनींचे आणि बांधवांचे आभार मानले.
7 / 7
फडणवीस यांनी लिहिलं की, झ्युरिकच्या मंत्रमुग्ध करणार्या सौंदर्याने आणि माझ्या लाडक्या मराठी भगिनी-बंधूंनी केलेल्या उत्साहवर्धक स्वागताने आणि मायेने भरलेल्या औक्षणाने भारावून गेलो! या आदरातिथ्यासाठी आणि प्रेमासाठी सर्वांचे मनापासून आभार, असं ते म्हणाले.