सहा वर्षांपूर्वी मानुषी छिल्लरने 17 वर्षांनंतर भारतात पुनरागमन करत मिस वर्ल्डचा किताब जिंकून इतिहास घडवला होता.
मिस वर्ल्डचा किताब पटकावण्यापासून ते मानुषीने फॅशन, सोशल वर्क आणि बॉलीवूडच्या जगात सहजतेने आपली छाप पाडली.
एका छोट्या शहरातून जागतिक फॅशन स्टेजपर्यंतचा तिचा हा प्रवास कायम प्रेरणादायक असाच आहे.
फॅशन, अभिनय यांच्या पलीकडे जाऊन मानुषीची सामाजिक बांधिलकी देखील तिच्या प्रयत्नांतून दिसून येते.
पर्यावरणविषयक समस्यांबद्दलची तिची बांधिलकी गणेशोत्सवानंतर समुद्रकिनारी साफसफाई, सकारात्मक बदलांचा पुरस्कार यांसारख्या उपक्रमांतून दिसून येते.