तेजस्विनी लोणारी आणि शिवसेनेचे युवा नेते समाधान सरवणकरांच्या साखरपुड्याचे खास क्षण!
Tejaswini Lonari and Samadhan Saravankar यांचा साखरपुडा पार पडला. या साखरपूड्याच्या बातमीने चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.
shruti letsupp
Letsupp (22)
मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि शिवसेनेचे युवा नेते समाधान सरवणकर यांचा साखरपुडा पार पडला.
या साखरपूड्याच्या बातमीने चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. तसेच या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत.
त्यांच्या खास साखरपुड्याच्या सोहळ्याला चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यांनंतर त्यांच्यावर सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
या भव्या साखरपुड्याच्या कार्यक्रमानंतर लवकरच तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर हे लग्नबंधनात अडकणार आहेत.
तेजस्विनी लोणारीबद्दल सांगायचं झालं तर बिग बॉस मराठी या शोमुळे ती घराघरांत पोहचली.
तर चित्तोड की रानी पद्मिनी या हिंदी मालिकेतून तिने रूपेरी पडद गाजवला आहे.
त्यानंतर मराठीमध्ये पाऊल टाकत तीने मकरंद अनापुरेसोबर छापा काटा हा सिनेमा केला. तो विशेष गाजला.
तर नुकतच तिने काही दिवसांपूर्वी कर्करोगाने निधन झालेली अभिनेत्री प्रिया मराठेला स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे. या मालिकेत रिप्लेस केलं होतं.
आता तेजस्विनीने तिचं स्वत: चं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आहे. तसेच ती सामाजित कार्यातही सहभागी होते.