जगदंबा माता देवी माझ्यासाठी खास! तेजस्विनीचं फोटोशूट एकदा पाहाच…
अभिनेत्री तेजस्विनी लोणारी सध्या चर्चेत आहे, ती तिच्या यूट्यूब चॅनलमुळे. नवरात्री निमित्तानं तिने येवलामधल्या एका खास मंदिराला भेट दिली आहे.

- अभिनेत्री तेजस्विनी लोणारी सध्या चर्चेत आहे, ती तिच्या यूट्यूब चॅनलमुळे. अभिनयाचा सोबतीला स्वतःची निर्मिती असलेल्या यूट्यूब चॅनलमधून तिने महाराष्ट्रामधल्या मंदिरांचा प्रवास सुरू केला आहे.
- असं म्हणतात की, इथे मागितलेली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होते. नवसाची देवी असलेली ही माता जगदंबा कायम सगळ्यांचं रक्षण करते.
- मी मुळात येवल्याची असल्याने प्रत्येक नवरात्रीमध्ये माझं मूळ असलेल्या येवल्याच्या जगदंबा माता मंदिर कोट्टमगा इथे नक्की जाते. आमच्या साठी हे श्रध्दा स्थान आहे.
- याबद्दल बोलताना तेजस्विनी लोणारी सांगते, टेम्पल ट्रेल्स मधला हा मंदिरांचा प्रवास. नवरात्रीच्या उत्सवात महाराष्ट्रामधल्या अश्या एका मंदिरात जाऊन पोहचला, जे माझ्या खूप जवळच आहे.
- नवरात्री निमित्तानं तिने येवलामधल्या एका खास मंदिराला भेट दिली आहे.
-
अभिनेत्री असलेल्या तेजस्विनीने स्वतःचा हा निर्मिती विश्वातला प्रवास देखील सुरू केला.येणाऱ्या काळात ती कोणत्या नवीन भूमिकांमध्ये दिसणार आहे, हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
- फॅशन लाईफ स्टाईल यांना एक सणाचा मॉर्डन टच देऊन तिने हे सुंदर फोटो शूट केलं आहे.
- माझ्या मंदिरांच्या प्रवासात हे मंदिर प्रेक्षकांना दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. दरवर्षी नवरात्रीचे उपवास करत असताना नऊ दिवसाचं खास फोटो शूट करणं, हे खूप खास गोष्ट आहे.