Suruchi Adarkar Photo : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुरुची अडारकर (Suruchi Adarkar) नुकतीच विवाहबंधनात अडकली. तिने अभिनेता पियुष रानडे (Piyush Ranade) सोबत सात फेरे घेतले आहेत.
2 / 5
पियुष आणि सुरुचीने लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत पियुष सुरूचीच्या गळ्यात मंगळसुत्र बांधतांना दिसतो.
3 / 5
सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये सुरूची आणि पियुषची जोडी कमाल दिसत आहे. लग्नाचे सुंदर फोटो शेअर केल्यानंतर फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
4 / 5
पियुष रानडेचं हे तिसरे लग्न आहे. यापूर्वी तो अभिनेत्री शाल्मली टोळ्येसोबत लग्नबंधनात अडकला होता. पण, काही कारणाने ते विभक्त झाले होते. यानंतर त्याने मयुरी वाघसोबत दुसरे लग्न केले होते.
5 / 5
छोट्या पडद्यावरील 'का रे दुरावा' या मालिकेने अभिनेत्री सुरुची अडारकर घराघरात पोहोचली होती. सुरुची नाटक आणि चित्रपटांमध्येही दिसली आहे.