सुरुची अडारकरने बांधली पियुष रानडेसोबत लग्नगाठ, पाहा फोटो
Suruchi Adarkar Photo : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुरुची अडारकर (Suruchi Adarkar) नुकतीच विवाहबंधनात अडकली. तिने अभिनेता पियुष रानडे (Piyush Ranade) सोबत सात फेरे घेतले आहेत.
पियुष आणि सुरुचीने लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत पियुष सुरूचीच्या गळ्यात मंगळसुत्र बांधतांना दिसतो.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये सुरूची आणि पियुषची जोडी कमाल दिसत आहे. लग्नाचे सुंदर फोटो शेअर केल्यानंतर फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
पियुष रानडेचं हे तिसरे लग्न आहे. यापूर्वी तो अभिनेत्री शाल्मली टोळ्येसोबत लग्नबंधनात अडकला होता. पण, काही कारणाने ते विभक्त झाले होते. यानंतर त्याने मयुरी वाघसोबत दुसरे लग्न केले होते.
