स्वरा भास्करनं फहाद जिरार अहमदसोबत लग्नगाठ बांधली
फहाद जिरार हा सामाजिक कार्यकर्ता आहे.
समाजवादी पक्षाची युवक आघाडी असलेल्या समाजवादी युवजन सभा या संघटनेचा महाराष्ट्र अध्यक्ष आहे.
स्वरा म्हणते, ‘काहीवेळा तुम्ही तुमच्या शेजारी असलेली एखादी गोष्ट दूरवर शोधता. आम्ही प्रेम शोधत होतो, परंतु आम्हाला प्रथम मैत्री मिळाली. माझ्या हृदयात तुझं स्वागत आहे.’
स्वरानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील एक व्हिडीओ शेअर करुन लग्नाची माहिती दिली.
स्वरा आणि फहाद यांनी कोर्ट मॅरेज केले आहे.