राष्ट्रपती भवनात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पद्म पुरस्कारांनी सन्मान, पाहा फोटो
shruti letsupp
Padma awards
राष्ट्रपती भवनात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पद्म पुरस्काराचं वितरण करण्यात आलं.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिग्गजांना सन्मानित करण्यात आलं.
यामध्ये मनोरंजन क्षेत्रातील ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि भारतीय पार्श्वगायिका उषा उथुप यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश आहे.
तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांना देखील यावेळी गौरविण्यात आले. त्यात व्यंकय्या नायडू आणि राम नाईक यांचा समावेश आहे.
तसेच मराठी चित्रपटासाठी योगदान देणारे दत्तात्रय अंबादास मायालू यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
क्रीडा क्षेत्रातील टेनिस खेळाडू रोहन बोपन्ना यांना देखील पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.