मोठी बातमी! राष्ट्रपती दरबार हॉल आणि अशोक हॉलचे नामकरण, जाणून घ्या नवीन नावे
Rashtrapati Bhavan : केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेत राष्ट्रपती दरबार हॉलचे (Durbar Hall) नाव बदलले आहे. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल आणि अशोका हॉलची (Ashoka Hall) या इमारतीचे नाव बदलण्यात आले आहे. दरबार हॉलचे नवीन नाव ‘गणतंत्र मंडप’ आणि अशोका हॉलचे नवीन नाव ‘अशोका मंडप’ असे करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रपती भवनाने एका प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.
सर्वसामान्यांचा संपर्क राष्ट्रपती भवनाशी वाढवण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात येत आहे. या दोन महत्त्वाच्या इमारतींची नावे बदलणे हेही या दिशेने टाकलेले पाऊल आहे.अशी माहिती राष्ट्रपती भवनाने दिली आहे. महत्त्वाच्या कार्यक्रमांसोबतच सात राष्ट्रीय पुरस्कारांच्या सादरीकरणासाठीही दरबार हॉल ओळखला जातो.
Rashtrapati Bhavan’s ‘Durbar Hall’, ‘Ashok Hall’ renamed ‘Ganatantra Mandap’, ‘Ashok Mandap’, respectively
— Press Trust of India (@PTI_News) July 25, 2024
राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल आणि अशोका हॉल ही अनेक समारंभांची ठिकाणे आहेत. जिथे अनेक महत्वाचे समारंभ होत आहेत. एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ‘दरबार’ हा शब्द, ज्याचा अर्थ भारतीय राज्यकर्ते आणि ब्रिटीशांची न्यायालये आणि संमेलने होती, भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर आता संबंधित राहिला नाही, म्हणून त्याचे नाव बदलून गणतंत्र मंडप असे ठेवण्यात आले आहे. अशी माहिती राष्ट्रपती भवनाने एका निवेदनात दिली आहे.
दरमहा 27 कोटी रुपयांची हप्ते वसुली, लंकेंकडून पोलिसांचे रेट कार्ड जाहीर