अन् बॅडमिंटन कोर्टवर उतरल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पाहा खास फोटो
President Draupadi Murmu यांनी भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या सोबत बॅडमिंटन खेळाचा आनंद घेतला.

राष्ट्रपती द्रौपदी मुरमुरे यांनी बुधवारी राष्ट्रपती भवनामध्ये भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या सोबत बॅडमिंटन खेळाचा आनंद घेतला.

या दोघींचे बॅडमिंटन खेळतानाचे फोटो राष्ट्रपती सचिवालयाकडून अधिकृत एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आले आहेत.

हे फोटो शेअर करताना राष्ट्रपती सचिवलयाकडून म्हटलं गेलं आहे की, राष्ट्रपतींचे हे प्रेरणादायी पाऊल भारतीय बॅडमिंटन क्षेत्राला उभारी देण्यासाठी महत्त्वाचे ठरेल.

तर सायना नेहवाल हे फोटो शेअर करत म्हटलं आहे की, माझ्या जीवनातील हा अविस्मरणीय दिवस आहे. माझ्यासोबत बॅडमिंटन खेळल्याबद्दल खूप आभारी आहे.
