संसदेत ‘जय पॅलेस्टाईन’ ची घोषणा देणाऱ्या ओवैसींची जाणार खासदारकी? थेट राष्ट्रपतींना पत्र

संसदेत ‘जय पॅलेस्टाईन’ ची घोषणा देणाऱ्या ओवैसींची जाणार खासदारकी? थेट राष्ट्रपतींना पत्र

Asaduddin Owaisi : अठराव्या लोकसभेचा पहिला अधिवेशन सुरु झाला असून या अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवस सर्व खासदारांचा शपथविधी पार पडला आहे. काल (25 जून) रोजी संसदेत पाचव्यांदा खासदार म्हणून शपथ घेताना एआयएमआयएमचे (Aimim) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी (Asaduddin Owaisi) ‘जय पॅलेस्टाईन’ ची (Jai Palestine) घोषणा दिली होती. आता या घोषणेवरून त्यांचे संसदेचे सदस्यत्व काढून टाकण्याची मागणी करण्यात येत आहे. यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र देखील लिहिण्यात आला आहे.

असदुद्दीन ओवैसींची खासदारकी रद्द करण्यासाठी ज्येष्ठ वकील हरी शंकर जैन (Hari Shankar Jain) यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांना पत्र लिहिले आहे. 25.06.2024 रोजी संसद सदस्य म्हणून शपथ घेताना असदुद्दीन ओवेसी यांनी परदेश म्हणजे पॅलेस्टाईनशी निष्ठा दाखवल्याबद्दल त्यांना अपात्र ठरवण्यात यावा अशी विनंती ज्येष्ठ वकील हरी शंकर जैन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली आहे.

संसदेत खासदारकीची शपथ घेतल्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी जय भीम, जय मीम, जय तेलंगणा आणि जय पॅलेस्टाईन अशी घोषणा दिली होती. त्यांनी दिलेल्या या घोषणेनंतर सत्ताधारी भाजपच्या काही खासदारांकडून याचा विरोध करण्यात आला आणि सभागृहात गदारोळ सुरू झाला.

तर दुसरीकडे या प्रकरणात संसदेत माध्यमांशी बोलताना ओवेसी म्हणाले की, शपथ घेताना इतर सदस्यही वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहेत. मी ‘जय भीम, जय मीम, जय तेलंगणा, जय पॅलेस्टाईन’ म्हटले आहे तर हे कसे चुकीचे आहे? महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी पॅलेस्टाईनबद्दल काय म्हणाले ते वाचा. मला देखील भारतीय संविधानाची थोडीशी माहिती आहे. असं माध्यमांशी बोलताना एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले.

तर केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी (G Kishan Reddy) आणि किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी या प्रकरणावरून ओवेसी यांच्यावर टीका केली आहे.

केंद्रीय मंत्री रेड्डी म्हणाले की, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी संसदेत दिलेला ‘जय पॅलेस्टाईन’चा नारा चुकीचा आहे. ही घटना सभागृहाच्या नियमांच्या विरोधात आहे. देशात राहून ओवेसी असंवैधानिक काम करत आहे हे लोकांनी समजून घेतले पाहिजे. असं ते म्हणाले.

तर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी देखील या प्रकरणावरून असदुद्दीन ओवेसी यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, शपथ घेताना दुसऱ्या देशाची घोषणा करणे अयोग्य आहे.

राम शिंदे यांच्या पाठपुरवठ्याला यश, कर्जत- जामखेडसाठी 12 कोटी 68 लाखांचा पीकविमा मंजुर

पॅलेस्टाईन किंवा इतर कोणत्याही देशाशी आमचे कोणतेही वैर नाही मात्र खासदारकीची शपथ घेताना एकाद्या सदस्याने दुसऱ्या देशाची घोषणा देणे योग्य नाही असं ते म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज