असदुद्दीन ओवेसी यांचं मोठं वक्तव्य! म्हणाले, हिजाब घालणारी महिला भारताची पंतप्रधान होईल

असदुद्दीन ओवेसी यांचं मोठं वक्तव्य! म्हणाले, हिजाब घालणारी महिला भारताची पंतप्रधान होईल

Owaisi Said Woman Wearing Hijab Will PM of India : एमआयएम पक्षाचे प्रमुख आणि हैदराबाद लोकसभेचे उमेदवार विद्यमान खासदार असदुद्दीन ओवेसी हे कायम आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यांनी असंच एक मोठ वक्तव्य केलं असल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. उद्या चौथ्या टप्प्यातील लोकसभेसाठीचं मतदान होत आहे. (Hijab )  हैदराबादमध्येही उद्या मतदान आहे. (Asaduddin Owaisi) त्यातच ओवेसी यांचं हे वक्तव्य आल्याने राजकीय वातावरण तापलं आहे.

 

हिजाब घातलेली महिला पंतप्रधान होईल

एका मुलाखतीत बोलताना मुस्लीम पंतप्रधान कधी होणार या प्रश्नाला उत्तर देताना ओवेसी म्हणाले, नक्कीच एकेदिवशी भारताला मुस्लीम पंतप्रधान मिळेल. तसंच, हिजाब घातलेली मुस्लीम महिला भारताची पंतप्रधान होईल असं मोठं भाकीत ओवेशी यांनी यावेळी केलं आहे. त्याचबरोबर, कदाचित तो दिवस पाहण्यासाठी मी जिवंत नसेल, पण एकेदिवशी नक्कीच हे घडेल अशी आशाही ओवेशी यांनी यावेळी व्यक्त केली.

 

दखलही घेतली नाही

इंडिया आघाडीशी युती करण्याबाबद ओवेसी म्हणाले, आमच्या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी तीनवेळा इंडिया आघाडीतील संबंधितांना प्रस्ताव पाठवला. परंतु, त्यांच्या या प्रस्तावाची साधी दखलही इंडिया आघाडीने घेतली नाही अशी माहिती ओवेसी यांनी यावेळी दिली. तसंच, जर कुणी आम्हाला आघाडीत घ्यायला तयार नसेल तर आमच्यासाठी हा काही पर्याय नाही. आम्ही आमच्या पद्धतीने आमची राजकीय वाटचाल सुरूच ठेवू असंही ते यावेळी म्हणाले.

 

एकही उमेदवार दिला नाही

मुस्लिम सहभागाविषयीही ओवेसी यांनी इंडिया आघाडीवर टीका केली. ते म्हणाले, भाजपसारखच इंडिया आघाडीनेही मुस्लीम समुदायासोबत अंतर राखलं आहे. महाराष्ट्र हे त्याचे सर्वात मोठं उदाहरण आहे. येथे 48 मतदारसंघ आहेत. इंडिया आघाडीने एकाही मतदारसंघात मुस्लीम उमेदवार दिला नाही. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि नवी दिल्लीतही असं झाल आहे. हे असं होत राहिलं तर लोकसभेत मुस्लिमांचं प्रतिनिधित्व कमीच होणार असंही ते यावेळी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज