विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात; कोणत्या नेत्याने कशी केली एन्ट्री? पाहा खास फोटो
Winter session ला सुरुवात झाली. यावेळी आमदारांनी विधिमंडळामध्ये कशा प्रकारे एन्ट्री केली याचे काही खास फोटो सोशल मिडीयावर पाहायला मिळत आहेत.
shruti letsupp
Winter Session
राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. यावेळी कोणत्या आमदार किंवा नेत्याने विधिमंडळामध्ये कशा प्रकारे एन्ट्री केली याचे काही खास फोटो सोशल मिडीयावर पाहायला मिळत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अधिवेशनात लोकहिताचे निर्णय सभागृहात घेतले जातील अशी ग्वाही दिली आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्यासह नागपूर येथील विधानभवनात प्रवेश केला.
तर राज्याचे दुसरे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे देखील त्यांच्या नेहमीच्या हटके स्टाइलमध्ये विधानभवनात येताना दिसले.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या हिरव्यागार साडीमध्ये विधानभवनात पोहचल्या.
आमदार गोपीचंद पडळकर हे देखील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अगदी हटके स्टाइलमध्ये येताना पाहिलया मिळाले.
त्यानंतर शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवनात पोहचल्याचा फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे.
माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे चर्चेत राहणारे आमदार धनंजय मुंडे यांनी देखील त्यांच्या नव्या लूकमध्ये विधानभवनात प्रवेश केला.