विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात; कोणत्या नेत्याने कशी केली एन्ट्री? पाहा खास फोटो
Winter session ला सुरुवात झाली. यावेळी आमदारांनी विधिमंडळामध्ये कशा प्रकारे एन्ट्री केली याचे काही खास फोटो सोशल मिडीयावर पाहायला मिळत आहेत.
- राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. यावेळी कोणत्या आमदार किंवा नेत्याने विधिमंडळामध्ये कशा प्रकारे एन्ट्री केली याचे काही खास फोटो सोशल मिडीयावर पाहायला मिळत आहेत.
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अधिवेशनात लोकहिताचे निर्णय सभागृहात घेतले जातील अशी ग्वाही दिली आहे.
- राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्यासह नागपूर येथील विधानभवनात प्रवेश केला.
- तर राज्याचे दुसरे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे देखील त्यांच्या नेहमीच्या हटके स्टाइलमध्ये विधानभवनात येताना दिसले.
- हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या हिरव्यागार साडीमध्ये विधानभवनात पोहचल्या.
- आमदार गोपीचंद पडळकर हे देखील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अगदी हटके स्टाइलमध्ये येताना पाहिलया मिळाले.
- त्यानंतर शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवनात पोहचल्याचा फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे.
- माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे चर्चेत राहणारे आमदार धनंजय मुंडे यांनी देखील त्यांच्या नव्या लूकमध्ये विधानभवनात प्रवेश केला.








