अण्णा हजारेंकडून पंतप्रधान मोदींचे सांत्वन

अहमदनगर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे आज पहाटे निधन झाले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून सांत्वन करत श्रध्दांजली वाहिली. हिराबेन यांना अहमदाबाद येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारावेळी त्यांचे निधन झाले. हिराबेन यांनी पहाटे साडेतीन वाजता अखेरचा श्वास घेतला. अण्णा हजारे […]

ठाकरे सरकारला लोकायुक्त कायदा नको होता; अण्णांकडून ठाकरेंवर टीका

Anna Hazare

अहमदनगर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे आज पहाटे निधन झाले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून सांत्वन करत श्रध्दांजली वाहिली.

हिराबेन यांना अहमदाबाद येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारावेळी त्यांचे निधन झाले. हिराबेन यांनी पहाटे साडेतीन वाजता अखेरचा श्वास घेतला.

अण्णा हजारे यांनी आपल्या शोक संदेश म्हटले आहे की, ‘देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दुःख झाले. जीवनात आईचे स्थान खूप महत्वाचे आहे.

जोपर्यंत आयुष्यात आईचा सहवास आहे तोपर्यंत कसलीच कमतरता भासत नाही. पंतप्रधानांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती देवो अशी प्रार्थना करतो.’ असे शोकसंदेशात म्हटले आहे.

Exit mobile version