कोलंबियामध्ये भीषण भूकंप! 132 जणांचा मृत्यू, 1500 लोक जखमी, मृत्यांचा आकडा वाढण्याची शक्यता

अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंप स्थानिक वेळेनुसार सकाळी 7:34 वाजता (12:34 UTC) झाला.

News Photo   2026 08 11T085414.214

कोलंबियामध्ये भीषण भूकंप! 132 जणांचा मृत्यू, 1500 लोक जखमी, मृत्यांचा आकडा वाढण्याची शक्यता

दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देश भीषण (Earthquake) भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे. सोमवारी (10 ऑगस्ट) आलेल्या 7.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या विनाशकारी भूकंपामुळं आतापर्यंत 115 जणांचा मृत्यू झाला असून ही संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी बहुमजली इमारती कोसळल्या असून शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या भूकंपाचे हादरे शेजारील व्हेनेझुएला देशातही तीव्रतेने जाणवले.

अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंप स्थानिक वेळेनुसार सकाळी 7:34 वाजता (12:34 UTC) झाला. या भूकंपाचे केंद्र कोलंबियाच्या ‘चोको’ विभागातील ‘सॅन जोस डेल पालमार’पासून सुमारे ५ किलोमीटर पूर्वेला जमिनीखाली 107 किलोमीटर खोलीवर होते. भूकंपामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या शहरांमध्ये मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

6 हवाई अड्ड्यांवरील विमानसेवा ठप्प

भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे कोलंबियातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. पेरेरा, मनिजालेस, क्विब्दो, आर्मेनिया, कार्टागो आणि बुएनाव्हेन्तुरा या ६ प्रमुख शहरांमधील विमानतळांच्या पायाभूत सुविधांचे आणि धावपट्ट्यांचे नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या विमानतळांवरील सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत.

कोलंबियात भूकंपाचा धोका का जास्त?

दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया हा भाग अनेक टेक्टोनिक प्लेट्सच्या सीमेवर आणि फॉल्ट लाईन्सवर वसलेला आहे. त्यामुळे हा देश जगात सर्वाधिक भूकंपप्रवण क्षेत्रांपैकी एक मानला जातो. कोलंबियन जिओलॉजिकल सर्व्हिसनुसार, देशात आतापर्यंत १०० हून अधिक विनाशकारी भूकंपांची नोंद झाली आहे.

Exit mobile version