Download App

मादागास्करमध्ये IOIG गेम्सच्या उद्घाटन समारंभात चेंगराचेंगरीत 12 ठार; 80 जखमी

  • Written By: Last Updated:

Madagascar Stadium Stampede  : आफ्रिकन देश मादागास्करमध्ये एक मोठी दुर्घटना घडली असून इंडियन ओशन आयलँड गेम्सच्या (IOIG) च्या उद्घाटन समारंभात चेंगराचेंगरीमध्ये 12 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर 80 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या भीषण दूर्घटनेनंतर देशाचे राष्ट्रपतींनी शोक व्यक्त केला आहे.

https://letsupp.com/politics/why-not-split-in-ncp-sharad-pawar-said-detailed-reason-81414.html

नेमकं काय घडलं?

इंडियन ओशन आयलँड गेम्सचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी मादागास्करमधील बारिया स्टेडियमवर पार पडला. कार्यक्रमासाठी सुमारे 50 हजार प्रेक्षक आले होते. यादरम्यान स्टेडियमच्या प्रवेशद्वारावर अचानक चेंगराचेंगरी झाली. यात 12 जणांचा मृत्यू झाला तर, 80 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. यातील 11 जणांची प्रकृती गंभीर आहे.

‘बच्चू कडू कोण बाबा?’ गल्लीबोळातल्या लोकांवर..; कडूंच्या ‘त्या’ वक्तव्यावर पवारांचा खोचक टोला

दरम्यान, स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीचे खरे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. भीषण दूर्घटनेनंतरही मैदानात लेझर शो आणि फटाक्यांची आतषबाजी सुरू होती असा आरोप काही प्रेक्षकांनी केला आहे. इंडियन ओशन आयलँड गेम्स मेडागास्करमध्ये ३ सप्टेंबरपर्यंत होणार आहेत. या स्पर्धेत मॉरिशस, सेशेल्स, कोमोरोस, मादागास्कर, मेयोट, रीयुनियन आणि मालदीवमधील खेळाडू सहभागी झाले आहेत.

चेंगराचेंगरीची पहिली घटना नाही

अशाप्रकारे अपघात होण्याची ही या स्टेडियमधील पहिली घटना नाहीये. याआधीदेखील येथे अशाच प्रकारची भीषण चेंगराचेंगरी होऊन अपघात घडला होता. याआधी 2019 मध्ये एका कॉन्सर्टदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 15 जणांचा मृत्यू झाला होता. इंडियन ओशन आयलँड गेम्समध्ये विविध प्रकारच्या खेळांचे आयोजन केले जाते, ज्यात विविध देशांमधील खेळाडू सहभागी होत असतात.

Tags

follow us