Kiribati Becomes First Country To Enter New Year 2025 : 2024 च्या पूर्वसंध्येला जगभरात नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरु असल्याचं चित्र आहे. नवीन वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही तासच उरले आहेत, त्यामुळे नव्या वर्षांची सर्वच देशातील नागरिकांना उत्सुकता लागलीयं. मात्र, जगातला असा एक देश आहे जो सर्वांत आधी नवीन वर्ष 2025 ची सुरुवात झालीयं. प्रशांत महासागरस्थित किरीबाटी (Kiribati) देशात नव्या वर्षाला सुरुवात झालीयं. या देशात भारतीय वेळेनूसार दुपारच्या 3:30 वाजताच नव्या दिवसाची सुरुवात झाल्याने फटाक्यांची आतिषबाजी आणि नवीन वर्षानिमित्ताचा एकच जल्लोष या देशात पाहायला मिळत आहे.
जगातील देशातील वेगवेगळ्या वेळांनूसार नवीन वर्षांला सुरुवात होणार आहे. त्यामुळे भारताच्या आधी अनेक देशांमध्ये नव्या वर्षाचं स्वागत करण्यात येणार आहे. किरीबाटी हा एक प्रजासत्ताक देश असून एक ख्रिसमस आयलॅंड आहे. जगभरात सर्वच देशांच्या आधी किरीबाटी बेटावर नव्या वर्षाचा जल्लोष करण्यात येत आहे. या देशाला ख्रिसमस बेट म्हणूनही ओळखलं जात असून हा देश प्रशांत महासागराचा प्रजासत्ताक भाग आहे. या देशातील वेळ भारताच्या 7 ; 30 तासांनी पुढे आहे. म्हणजेच ज्यावेळी भारतात दुपारी 3:30 वाजलेले असतील त्यावेळी या देशात रात्रीचे 12 वाजतात. रात्री 12 वाजल्यापासूनच या देशात नवीन दिवस सुरु होत असतो.
कोणत्या देशांत नवीन वर्ष आधी येतं?
किरीबाटी आयलॅंड : 3.30 IST
चैथम आयलॅंड: 3.45 IST
न्यूझीलॅंड: 4.30 IST
फिजी आणि रुस : 5.30 IST
ऑस्ट्रेलिया: 6.30 IST
पपुवा न्यू गिनी: 7:30 IST
जपान, दक्षिण कोरिया: 8.30 IST
चीन, फिलिपींस: 9.30 IST
इंडोनेशिया: 10.30 IST
दरम्यान, किरीबाटी हा देश एक ख्रिसमस आयलॅंड म्हणून ओळखला जात असून नवीन वर्षाचं स्वागत सर्वात आधी हा देश करत असतो. हे बेट भारतीय वेळेनूसार दुपारी 3 : 30 वाजताच नवीन वर्ष उत्साहात साजरा केलं जातं. यावेळी जगभरातील अनेक भागांत सध्या 2024 च्या अखेरच्या दिवसांचा आनंद लुटत असल्याचं चित्र दिसून येत असतं, मात्र, किरीबाटीचे लोकं या वेळेच्या आधीपासून नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करीत असतात. हाऊलॅंड बेट आणि बेकर बेटावर अखेरीस नवीन वर्षाला सुरुवात होते. या बेटांवर भारतीय वेळेनूसार 1 जानेवारीला सायंकाळी 5 : 30 वाजता नव्या वर्षाला सुरुवात होते.