नवीन वर्षात सजणार, मराठी परंपरेचा साज, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार बहुप्रतिक्षित संगीत मानापमान!

  • Written By: Published:
नवीन वर्षात सजणार, मराठी परंपरेचा साज, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार बहुप्रतिक्षित संगीत मानापमान!

Sangeet Manapman : बहुप्रतिक्षित संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान” (Sangeet Manapman) 10 जानेवारी 2025 ला प्रदर्शित होणार असल्याची माहिती विजयादशमीचे औचित्य साधून जिओ स्टुडिओज्ने दिली आहे. “संगीत मानापमान” चित्रपटाचे पोस्टर देखील सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटात सुबोध भावे, सुमित राघवन आणि वैदेही परशुरामी महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटातील सुबोध भावेंचा (Subodh Bhave) पहिला पोस्टर सोशल मीडियावर रिलीज होताच या चित्रपटाची सर्वत्र सुरु झाली होती त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे सुमित राघवनचा मराठमोळा साज आणि पारंपरिक पोशाख मधला लूक पाहता या चित्रपटाची भव्यता झळकून येत आहे. त्यामुळे प्रेम, वीरता, शौर्य यांची गुंफण असलेले संगीत मानापमान नवीन वर्षात प्रेक्षकांसाठी एक मनोरंजनाची अविस्मरणीय भेट ठरणार आहे. संगीत मानापमानबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाले की, या मराठीतल्या एका अत्यंत अभिजात अशा नाट्यकृती वरती काम करायला मिळणं हे खरोखर भाग्याची गोष्ट आहे.

बालगंधर्व चित्रपटात बालगंधर्वची भूमिका करत असताना मानापमान या नाटकाशी संबंध आला, पण कधी तरी आपण त्याच्यावरती सिनेमा करू असा वाटलंही नव्हतं. पण मधल्या काळात कट्यार नंतर नवीन चित्रपटाची आखणी करताना सगळ्यात भावलं ते म्हणजे मानापमानची प्रेम कथा तसेच गोविंदराव टेंबेंसारख्या दिग्गज अशा संगीतकाराने संगीतबद्ध केलेली गाणी ज्याची इतक्या वर्षानंतर ही गोडी तशीच आहे बालगंधर्व असतील केशवराव भोसले असतील, दीनानाथ मंगेशकर असतील अशा दिग्गज नेत्यांचा स्पर्श, खडीलकरांची लेखनी असं एक वेग वेगळ्या अंगाने नटलेल्या नाटका वरती प्रेरित असा सिनेमा घडवताना तितक्याच तोलामोलाची मंडळी आजूबाजूला हवी होती.

जिओ स्टुडिओज ची भक्कम साथ,कट्यार आणि काशिनाथच्या वेळेस जी माझ्यासोबत टेक्निकल टीम होती ती हि तितक्याच प्रमाणे माझ्या सोबत उभी राहिली. सुमित राघवन, वैदेही आणि बरेच कलावंत आहेत ज्यांची नावं लवकरच तुमच्यासमोर येतील त्यांचा माझ्यावरचा विश्वास. मला असा वाटतं कि हा सिनेमा फक्त सुबोध भावेचा नसून संपूर्ण संघाचा सिनेमा आहे आणि नवीन वर्षाची आमच्या संगीत मानापमान टीम तर्फे सर्व रसिक प्रेक्षकांना हि संगीतमय प्रेम कथाभेट असणार आहे.

“दुर्दैवाने महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या पाठीशी राज ठाकरे”, राऊतांचा जोरदार पलटवार

संगीत मानापमान या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका सुबोध भावे करत आहे. ‘कट्यार काळजात घुसली‘ तसंच ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर‘ या चित्रपटाची संपूर्ण तांत्रिक टीम ह्या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येत आहे त्याचबरोबर मुख्य म्हणजे प्रसिध्द संगीतकार शंकर -एहसान – लॉय यांचे संगीत या चित्रपटासाठी असणार आहे. तर संगीत मानापमान या निर्मिती ज्योती देशपांडे करत आहे. तर या चित्रपटाची मार्केटिंग श्री गणेश करणार असून सुबोध भावे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. तर वैदेही परशुरामी, सुमित राघवन सारखे दिग्गज कलाकार या चित्रपटात दिसणार आहे. 10 जानेवारी 2025 रोजी राज्यातील सर्व चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube