Download App

Earthquakes : तुर्कस्तान, सिरियातील विनाशकारी भूकंप बळींची संख्या 24 हजारांवर

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : तुर्की आणि सीरिया या पश्चिम आशियाई देशांमध्ये 6 फेब्रुवारी रोजी झालेल्या भूकंपामुळे मोठे नुकसान झाले आहे. येथे, आपत्तीग्रस्त भागात आपत्ती निवारण आणि बचाव कार्य सुरू असताना, मृतदेह आणि जखमी लोक सापडत आहेत. मृतांचा आकडा 24 हजारांवर गेला. तर जखमींची संख्या 40 हजारांहून अधिक आहे.

7.8 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे तुर्कस्तान आणि सीरियामध्ये एवढी विध्वंस झाली की मृतांची संख्या 24 हजारांच्या पुढे गेली आहे. कडाक्याच्या थंडीत बचावकर्ते बचावकार्य करत आहेत. कधी ढिगाऱ्यातून जीव बाहेर पडत आहेत, तर कधी मृतदेह. गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. परिस्थिती इतकी बिघडली आहे की किमान 10 लाख लोकांकडे खायलाही पैसे नाहीत. एकट्या सीरियात बेघरांची संख्या 5.3 दशलक्ष इतकी झाली आहे.

तुर्कीच्या राज्य वृत्तसंस्थेच्या अनादोलूच्या म्हणण्यानुसार, आग्नेय तुर्कीतील गाझियानटेप प्रांतातील नूरदागी जिल्ह्यात झाहिदे काया नावाच्या गर्भवती महिलेला 115 तासांनंतर ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढण्यात आले. त्यांची सहा वर्षांची मुलगी कुब्रा हिला देखील ढिगाऱ्यातून वाचवण्यात आले. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ती सुरक्षित आहे.

तुर्कस्तान-सिरियातील एक कोटी 35 लाखांहून अधिक नागरिकांना या भूकंपाचा फटका बसला आहे. काही शहरांच्या रस्त्यांवर पांघरूण, गालिचे व कापडांत गुंडाळलेले मृतदेह पडले आहेत. शवागार व स्मशानभूमीवरही ताण वाढला आहे. या भागातील तापमान गोठणबिंदूच्या खाली आहे.

Tags

follow us