भीषण अपघात! पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमध्ये बस दरीत कोसळी; २६ जणांचा मृत्यू, नऊ जण जखमी

पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमध्ये आज बस दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात २६ जणांचा मृत्यू झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात.

Sindhudurg Accident

Sindhudurg Accident

Accident : पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमध्ये आज बस दरीत कोसळून अपघात झाला. (Accident) या अपघातात २६ जणांचा मृत्यू झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, पाकिस्तानमध्ये दुसऱ्या एका बस अपघातात ११ भाविकांचा मृत्यू झाला.

नेपाळमध्ये महाराष्ट्रातील 14 जणांचा मृत्यू; हेल्पलाईन नंबर्स जारी; काय म्हणाले फडणवीस?

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकव्याप्त काश्‍मीरमधील एका घाटावरून बस जात असताना ती अनेक फूट खोल दरीत कोसळली. चालक व वाहक यांच्यासह बसमध्ये ३५ जण होते. अपघातात बसचा चेंदामेंदा होऊन यापैकी २६ जणांचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले. मृतांमध्ये बालके व महिलांचाही समावेश आहे. पोलिसांच्या मदतीने नागरिकांनी दरीत कोसळलेल्यांना बाहेर काढले. या अपघाताबद्दल देशाचे अध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

कसारा घाटात भीषण अपघात, वाहन दरीत कोसळली, 5 जणांचा मृत्यू

दुसऱ्या एका घटनेत बलुचिस्तान प्रांतातील मकरान कोस्टल महामार्गावरून ७० यात्रेकरूंना घेऊन बस वेगाने जात असताना नियंत्रण सुटल्याने ती उलटली. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला, तर ३५ जण जखमी झाले. हे सर्व प्रवासी शिया पंथीय असून ते इराणमधून यात्रा करून परतत होते. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी यात्रेकरूंची बस इराणमध्ये कोसळून झालेल्या अपघातात ३५ भाविकांचा मृत्यू झाला होता.

Exit mobile version