44 Pakistani Migrants Dead In Boat Drowned Near Spain : स्पेनला जाणारी बोट समुद्रात बुडाल्याने (Boat Drowned) 50 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 44 पाकिस्तानी (Pakistani) नागरिक होते. मॉरिटानिया या आफ्रिकन देशातून स्पेनला (Spain) निघालेल्या बोटीला 2 जानेवारी रोजी हा अपघात झाला होता. ही बोट सुमारे 13 दिवसांपासून बेपत्ता होती. वॉकिंग बॉर्डर्स या स्थलांतरित हक्क गटाने सांगितले की, मोरोक्कन अधिकाऱ्यांनी बुधवारी 36 जणांची सुटका केली, तर 50 जणांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी 2024 मध्ये स्पेनमध्ये जाण्याच्या प्रयत्नात मोठ्या संख्येने स्थलांतरितांचा मृत्यू झाला होता.
पालकमंत्रिपदाचा तिढा कायम, महायुतीच्या नेत्यांची दोन दिवसांत होणार बैठक
‘वॉकिंग बॉर्डर्स’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हेलेना मालेनो यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले की, बुडालेल्यांपैकी 44 जण पाकिस्तानचे आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने या घटनेवर एक निवेदन जारी केलंय. त्यांनी सांगितलं की, मोरोक्कोमधील दूतावास बचाव कार्यात मदत करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे. याशिवाय, पाकिस्तानी नागरिकांना मदत करण्यासाठी आणि आवश्यक मदत देण्यासाठी मोरोक्कोमधील पाकिस्तानी दूतावासातील एक टीम डाखला येथे पाठवण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने सांगितले की, रबत (मोरोक्को) येथील आमच्या दूतावासाने आम्हाला कळवले आहे की मॉरिटानियाहून पाकिस्तानी नागरिकांसह 80 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट डाखला बंदराजवळ उलटली आहे. या दुर्घटनेतून बचावलेल्या अनेक पाकिस्तानी नागरिक आणि इतरांना डखलाजवळील छावणीत ठेवण्यात आले आहे. आम्ही लवकरच मदत देत आहोत. पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केलाय.
…अखेर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची ‘सिडको’च्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी
पीएम शरीफ यांनी इंस्टाग्रामवर लिहिले की, मोरोक्कोच्या किनाऱ्यावर बोट पलटी झाल्याची अत्यंत चिंताजनक बातमी आली आहे. या बोटीत 80 हून अधिक प्रवासी होते, ज्यात अनेक पाकिस्तानी आहेत. ही घटना माझ्यासाठी आणि संपूर्ण देशासाठी धक्कादायक आहे. ते म्हणाले, मी परराष्ट्र मंत्रालयाला मोरोक्कोमधील स्थानिक अधिकाऱ्यांशी बोलून बेपत्ता, वाचलेल्यांना शोधून काढण्यासाठी आणि या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह परत आणण्याचे निर्देश दिले आहेत.
या दुर्घटनेत एकूण 50 लोकांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये 44 पाकिस्तानी आणि सहा इतर देशांतील लोक होते. बोट बेपत्ता झाल्याच्या अनेक दिवसानंतर ही घटना घडल्याचे वॉकिंग बॉर्डर्सने सांगितले. सहा दिवसांपूर्वी ही बोट बेपत्ता झाल्याची माहिती संबंधित देशांच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. कॅनरी बेटांचे प्रादेशिक नेते फर्नांडो क्लॅविजो यांनी स्पेन आणि युरोपला अशा दुर्घटना टाळण्यासाठी कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.