Download App

अख्खा देशच इंटरनेटवर पडीक, ‘या’ देशात 99 टक्के लोकांना इंटरनेटचं वेड; भारताचा नंबर कितवा?

जगात इंटरनेटचा सर्वाधिक वापर दक्षिण कोरियात (South Korea) केला जातो. या देशातील 99 टक्के लोकसंख्या इंटरनेटचा वापर करते.

These Countries Use Most Internet : आज जगाच्या कानाकोपऱ्यात इंटरनेटचा (Internet) वापर होत आहे. इंटरनेट नसेल तर सर्वच कामे अडून पडतात. पण तुम्हाला कदाचित माहिती नसेल की कोणत्या देशात किती प्रमाणात इंटरनेटचा वापर केला जातो. इंटरनेटच्या वापराच्या बाबतीत प्यू रिसर्च सेंटरने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात कोणत्या देशातील लोक सर्वाधिक इंटरनेट वापरतात याची माहिती देण्यात आली आहे. या यादीत भारताचाही समावेश आहे. इंटरनेट वापरणाऱ्या देशांची यादी वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने प्यू रिसर्च सेंटरच्या हवाल्याने 2022 आणि 2023 ग्लोबल अटीट्युड सर्वेक्षणानुसार जारी केली आहे.

जगात इंटरनेटचा सर्वाधिक वापर दक्षिण कोरियात (South Korea) केला जातो. या देशातील 99 टक्के लोकसंख्या इंटरनेटचा वापर करते. दक्षिण कोरियाच्या शेजारील उत्तर कोरियात (North Korea) इंटरनेट जवळजवळ वापरलेच जात नाही हे विशेष. स्वीडन आणि नेदरलँड्स या दोन देशांतील नागरिक देखील इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. या देशांतील जवळपास 96 टक्के लोकसंख्या इंटरनेटचा वापर करते.

अर्रर्र.. देशभरात एअरटेल ठप्प, कॉलिंग अन् इंटरनेट वापरण्यास अडचण

अमेरिकेशेजारी असलेल्या कॅनडात (Canada) भारतीय मोठ्या संख्येने राहतात. भारताप्रमाणेच चीन, जपान आणि युरोपातील नागरिक येथे मोठ्या प्रमाणात आहेत. आजमितीस कॅनडातील 95 टक्के लोक इंटरनेटचा वापर करतात. ग्रीस, सिंगापूर आणि मलेशियातील 94 टक्के लोक इंटरनेटचा वापर करतात. जर्मनी, ब्रिटन आणि इटलीतील जनता सुद्धा इंटरनेटच्या वापरात आजिबात मागे नाही. या तीन देशांतील जवळपास 93 टक्के लोकसंख्या इंटरनेटचा वापर करते.

फ्रान्स, स्पेन, बेल्जियम आणि ब्राझील या चार देशांतील 92 टक्के लोक आज इंटरनेटचा वापर करत आहेत. तर अर्जेंटिनामधील 90 टक्के लोकसंख्या इंटरनेटचा वापर करते. याचप्रमाणे इस्राएल 89 टक्के, जपान 88 टक्के, मेक्सिको 83 टक्के, हंगेरी 81 टक्के, पोलंड 81 टक्के, इंडोनेशिया 78 टक्के, दक्षिण आफ्रिका 78 टक्के, केनिया 66 टक्के आणि नायजेरियामधील 57 टक्के लोक इंटरनेटचा वापर करतात.

भारतात इंटरनेटचा वापर वाढतोय..

भारताचा विचार केला तर आज भारत लोकसंख्येच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारत वेगाने प्रगती करत आहे. जगात पाचव्या क्रमांकावर भारताची अर्थव्यवस्था आहे. अशा परिस्थितीत भारतात इंटरनेटचा वापर अतिशय वेगाने वाढत आहे. प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार सध्या भारतातील 56 टक्के लोकसंख्या इंटरनेटचा वापर करत आहे.

भारतीयांना इंटरनेटचं वेड! दिवसातले पावणे सात तास ऑनलाइन; रिपोर्टमधून खुलासा

follow us