Download App

A. K. Antony च्या पुत्राची काँग्रेसला सोडचिठ्ठी; बीबीसीच्या माहितीपटास केला होता विरोध

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : काँग्रेसचे जेष्ठ नेते ए.के अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. ब्रिटिश वृत्तवाहिनी बीबीसीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बनवलेल्या गुजरात दंगलीवर आधारित माहितीपटास विरोध दर्शवत त्यांनी सरकारचे समर्थन केले होते.

त्यानंतर त्यांनी आज एक ट्विट करत म्हटलं आहे की “मी काँग्रेसमधील माझ्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. माझ्यावर एक ट्वीट डिलीट करण्यासाठी दबाव आणला जात होता. तोही त्यांच्याकडून जे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी उभा राहण्याबाबत बोलतात, मी त्यांना नकार दिला.”

विरोध करताना काय म्हणाले होते अनिल अँटनी?

अनिल अँटनी यांनी काल एक ट्वीट करत या बीबीसीच्या माहितीपटाला विरोध केला होता. त्यात ते म्हणाले होते की भाजपाशी आमचे वैचारिक मतभेद आहेत. पण बीबीसी हे ब्रिटिश सरकारचे चॅनल आहे, ज्याला पूर्वग्रहांचा मोठा इतिहास आहे. या माहितीपटामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होऊ शकतो.”

सरकारकडून माहितीपटावर बंदी

केंद्र सरकारकडून गुजरात दंगलीवर आधारित असलेली बीबीसीची (BBC) ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ डॉक्युमेंट्री (‘India: The Modi Question’ Documentary) वादात सापडल्यानंतर केंद्र सरकारकडून यूट्यूबवरील व्हिडिओ आणि ट्विटर लिंक ब्लॉक केल्या आहेत. असे असताना देखील दिल्लीतील जेएनयू कॅम्पसमध्ये डॉक्युमेंटरीच्या स्क्रीनिंग ठेवण्यात आली होती. त्यावरून देखील मोठा वाद निर्माण झाला आहे.

Tags

follow us