Johnson & Johnson : गेल्या काही दिवसांपूर्वी वादात सापडलेली अमेरिकन बेबी कॉस्मेटीक प्रोडक्ट निर्माण करणारी कंपनी जॉन्सन अॅन्ड जॉन्सनला पुन्हा एक मोठा झटका बसला आहे. एका व्यक्तीने कंपनीवर दावा ठोकला आहे की, जॉन्सन अॅन्ड जॉन्सनच्या पावडरमुळे त्याला कॅंन्सर झाला आहे. त्यावर न्यायालयाने या कंपनीला मोठा दंड ठोठावला आहे. ( a person Affected by Censer due to Johnson & Johnson Talcum Powder Court impose fine 1.5 billion )
Uddhav Thackeray : ‘इतराचं राजकारण डावपेचाच, अजितदादांकडूनच योग्य न्याय मिळेल’
काय आहे नेमकं प्रकरण?
जॉन्सन अॅन्ड जॉन्सन ही अमेरिकन बेबी कॉस्मेटीक प्रोडक्ट निर्माण करणारी कंपनी आहे. एक 24 वर्षीय तरूणाने या कंपनीवर दावा केला आहे की, त्यांच्या कंपनीचे वेगवेगळे प्रोडक्ट तो लहानपणापासून तो वापरतो. तर आता त्याला जीवघेणा ह्रदयाच्या भोवतीच्या पेशींना मेसिथेलियमा हा कॅन्सर झाला आहे. हा कॅंन्सर या कंपनीच्याच पावडरमुळे झाल्याचं त्याने न्यायालयात सिद्ध केले आहे.
Maharashtra Assembly Session : पृथ्वीराजबाबांचा अचूक वार; चिडलेल्या मुनगंटीवारांनी इतिहासच काढला
हा प्रकार अमेरिकेतील कॅलिफॉर्नियात राहणाऱ्या एमोरी हर्नांडेज वलाडेज या तरूणाने ही तक्रार केली होती. गेल्यावर त्याने ऑकलॅंडच्या कॅलिफॉर्निया राज्यातील न्यायालायात हा दावा केला होता. त्यावर आता न्यायालयाने निर्णय दिला आहे. तर कंपनीला 18.8 मिलियन डॉलर म्हणजे तब्बल 1.5 अब्ज दंड ठोठालवला आहे.
न्यायालयाने काय म्हटले?
न्यायालयाने या तरूणाने केलेल्या दाव्याची शहानिशा केली. त्यानंतर न्यायालयाने त्याच्या बाजूने आणि कंपनीच्या विरोधात निर्णय दिला. कंपनीला दंड ठोठावला. तर यावर कंपनीने आपली बाजू मांडताना म्हटले की, आमचे प्रोडक्ट सुरक्षित आहेत. त्यातून कोणताही कॅन्सर होणार नाही.