ऑफिसमध्ये 45 मिनिटे लवकर पोहोचली महिला, कंपनीने कामावरून काढले; कारण काय?

Viral News : ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मेहनती आणि शिस्तप्रिय मानले जाते मात्र स्पेनमध्ये एक अशी घटना घडली आहे

Viral News

Viral News

Viral News : ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मेहनती आणि शिस्तप्रिय मानले जाते मात्र स्पेनमध्ये एक अशी घटना घडली आहे ज्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. स्पेनमध्ये एक महिला कर्मचारी ऑफिसमध्ये वेळेपेक्षा 45 मिनिटे दररोज लवकर पोहचणे महागात पडले आहे. ऑफिसने या महिलेला नोकरीवरुन काढून टाकले आहे. सध्या सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, एका डिलिव्हरी कंपनीत काम करणाऱ्या एका मिहिलेला (Spain Viral News) फक्त तिच्या नियोजित शिफ्टच्या खूप आधी पोहोचल्यामुळे कामावरुन काढून टाकण्यात आले आहे. या प्रकरणात ऑडिटी सेंट्रलने दिलेल्या वृत्तानुसार, या महिलेची ड्युटी सकाळी 7.30 वाजता सुरु होत होती मात्र महिला दररोज 30 ते 45 मिनिटे लवकर ऑफिसला पोहचत होती. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने तिला वारंवार लवकर न येण्याचे निर्देश दिले होते कारण त्यावेळी महिलेचे ऑफिसमध्ये कोणतेही नियोजित काम नव्हते. तसेच ही महिला स्वतःचा काम न करता ऑफिस सिस्टममध्ये व्यत्यय आणत होती. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने तिला वारंवार इशारा देखील दिला मात्र तरीही देखील महिलेकडून नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याने कंपनीने कठोर कारवाई करत महिलेला कामावरुन टाकण्याचा निर्णय घेतला.

महिलेकडून न्यायालयात याचिका दाखल

तर दुसरीकडे कंपनीने कामावरुन काढून टाकल्यानंतर महिलेने कंपनीच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ऑफिसमध्ये लवकर पोहोचणे हे अनुशासनहीन मानले जाऊ शकत नाही असा युक्तीवाद तिने न्यायालयात केला मात्र न्यायालयाने युक्तिवाद फेटाळून लावला आणि कंपनीचा निर्णय कायम ठेवला.

मुंबईचा महापौर भाजपचा नाही, तर महायुतीचा होणार…CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं

या प्रकरणात न्यायालयाने म्हटले आहे की, महिलेला अनेक वेळा इशारा देखील देण्यात आला होता मात्र तरीही देखील कंपनीच्या नियमांचे उल्लंघन महिलेकडून करण्यात आले. कंपनीत काम करताना कंपनीच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे आणि कंपनीच्या सूचनांकडे वारंवार दुर्लक्ष करणे म्हणडे अनुशासनहीनता आहे असं न्यायालयाने म्हटले आहे.

Exit mobile version