Pakistan News : लश्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचा मोस्ट वाँटेड अतिरेकी फैसल नदीम उर्फ अबू कताल याची शनिवारी पाकिस्तानात हत्या करण्यात आली. कताल हा एनआयएचा मोस्ट वाँटेड आतंकी होता. काश्मिरातील अनेक दहशतवादी हल्ल्यांत याच अबू कतालचा हात होता. 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याचा निकटवर्तीय म्हणून अबू कताल ओळखला जात होता. त्याच्या हत्येने पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. मागील काही काळापासून पाकिस्तानात लपून बसलेल्या भारताच्या शत्रूंची अशाच पद्धतीने हत्या सुरू आहेत.
पाकव्याप्त काश्मीरातील (POK) झेलममध्ये शनिवारी रात्री अबू कतालची हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. यात अबू कतालचा मृत्यू झाला. हाच अबू कताल पीओकेत बसून जम्मू काश्मीरात सातत्याने हल्ल्यांचे कट रचत होता. इतकेच नाही तर हाफिज सईदने जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या हल्ल्याची जबाबदारी अबू कतालला दिली होती. हाफिजने त्याा लश्करचा चीफ ऑपरेशनल कमांडर बनवले होते. हाफिजकडूनच त्याला आदेश मिळायचे यानंतर तो काश्मीरमध्ये मोठ्या हल्ल्यांची अंमलबजावणी करत होता.
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये चकमकीत 31 नक्षलवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलांची धाडसी कारवाई
जून महिन्यात रियासी येथे झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड अबू कतालच होता. 2023 मधील राजौरी हल्ल्यात सहभागासाठी एनआयएच्या चार्जशीटमध्ये अबू कतालचे नाव होते. 1 जानेवारी 2023 रोजी राजौरीतील ढांगरी गावात हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी एक आयईडी स्फोट झाला होता. यात सात लोकांचा मृत्यू झाला होता तर अनेक लोक जखमी झाले होते. या हल्ल्याच्या संदर्भात एनआयएने आपल्या चार्जशीटमध्ये लश्कर ए तैयबाच्या तीन हँडलर्सचे नाव घेतले होते.
अबू कतालच्या सूचनांनुसार दहशतवाद्यांनी लॉजिस्टिकची मदत घेतल्याचे तपासात आढळून आले होते. रियासी हल्ल्यानंतर ढांगरीत तीन महिन्यांपर्यंत दहशतवाद्यांना भोजन, आश्रय आणि अन्य प्रकारची लॉजिस्टिक मदत देण्यात आली होती.
जून महिन्यात रियासीतील शिवखोडी मंदिरातून दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर हल्ला झाला होता. या हल्ल्याचा मास्टरमाइंड अबू कताल सिंघी हाच होता. तसेच काश्मीरातील अनेक हल्ल्यांमागेही अबू कताल असल्याचे सांगितले जाते. 2023 मधील राजौरी हल्ल्यात देखील अबू कतालचा हात असल्याचे एनआयएने (National Investigation Agency) म्हटले होते.