Afghanistan Earthquake : काही दिवसांपूर्वी आलेल्या भूकंपात (Afghanistan Earthquake) हजारो लोकांचा मृत्यू झालेला असतानाच अफगाणिस्तानात पुन्हा शक्तिशाली भूकंप झाला. या भुकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने या भूकंपाची माहिती दिली. या भुकंपात मोठी हानी झाल्याची माहिती मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या भूकंपात शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या होत्या. तसेच या विनाशकारी भुकंपात दोन हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता. या संकटातून सावरत असतानाच आज पुन्हा भूकंपाचे हादरे बसले.
An earthquake with a magnitude of 6.1 on the Richter Scale hit Afghanistan at 06:11 am today: National Center for Seismology pic.twitter.com/ta7McYoN8n
— ANI (@ANI) October 11, 2023
बुधवारी सकाळी आलेल्या या भुकंपात दोन हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू पश्चिम अफगाणिस्तानातील शहर हेरातपासून 28 किलोमीटर दूरवर होता. जमिनीच्या आत दहा किलोमीटर खोलीवर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपात काही इमारतींना नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. किती लोकांचे मृत्यू या नव्या भूकंपात झाले आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
या आधी शनिवारी झालेल्या भुकंपातही मोठी वित्त आणि जीवितहानी झाली होती. शेकडो घरांचे नुकसान झाले. इमारती कोसळल्या तर दोन हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा बळी गेला. मागील दोन दशकांतील हा मोठा भूकंप होता. हेरातला अफगाणिस्तानची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते. या शहरात तब्बल 19 लाख लोक राहतात. अफगाणिस्तानातील दाट लोकवस्तीचे हे शहर आहे. मागील वर्षातही येथे असाच शक्तिशाली भूकंप झाला होता. या भुकंपात त्यावेळी एक हजार लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता तशाच भूकंपाचा अनुभव येथील लोक घेत आहेत.
या धक्क्यातून सावरत असतानाच बुधवारी सकाळी भूकंपाच्या धक्क्यानेच अफगाणिस्तान जागे झाले. जमीन हादरू लागल्याचे लक्षात येताच लोकांनी घराबाहेर धाव घेतली. त्यामुळे बऱ्याच जणांचे प्राण वाचले. या घटनेने नागरिक चांगलेच भयभीत झाले आहेत. त्यांच्या घर आणि अन्य मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.
इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा पीएम नरेंद्र मोदींना फोन, दोघांत काय चर्चा झाली?
आता या घटनेनंतर येथील स्थानिक प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेतला जात आहे. तसेच भूकंपग्रस्तांसाठी मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. अद्याप किती नुकसान झाले आहे, याची खात्रीशीर माहिती अद्याप मिळालेली नाही. या संकटाच्या काळात येथील तालिबान सरकारला चीनने मदतीचा हात पुढे केला असून लाखो डॉलर्स मदत जाहीर केली आहे.