Download App

पाकिस्तानात स्फोटानंतर आणखी एक घटना; हल्ल्यात मस्जिद कोसळली, 40 जण अडकले…

Terrorist attack Pakistan : पाकिस्तानात बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर आता पुन्हा एक हल्ल्याची घटना घडल्याचं समोर आलं आहे. पाकिस्तानस्थित मस्जिदमध्ये अतिरेक्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये मस्जिदचा एका भाग ढासळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बॉम्बस्फोट आणि अतिरेक्यांचा हल्ला या दोन्ही एकाच दिवशी घडल्या आहेत. या घटनेमुळे पाकिस्तानात सुरक्षा व्यवस्थेवरुन प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

Vishal Vs CBFC: सेन्सॉर बोर्डावरील आरोपाची CBI चौकशी करा, निर्मात्याची मागणी

बॉम्बस्फोटानंतर आता खैबरमधील हांगूमध्ये अतिरेक्यांचा हल्ला झाला आहे. या हल्ल्यामध्ये मस्जिद ढासळली असून मस्जिदच्या मलब्याखाली अनेक लोकं दबल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून इतर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. अद्यापही काही मृतदेह मलब्याखालीच अडकल्याने नेमका किती जणांचा मृत्यू झाला आहे, याबाबत माहिती समोर आलेली नाही.

Pune Rain : पुणेकरांनो सावधान! आजही कोसळधार; ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

पोलिस अधिकारी निसार अहमद यांच्या माहितीनूसार शुक्रवारी दुपारच्या सुमारास नमाज पठण सुरु असतानाच बॉम्बस्फोटची घटना घडली. त्यानंतर खैबरमधील मस्जिदमध्ये अतिरेक्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये मस्जिदचे छत खाली कोसळले असून जवळपास 40 जण मलब्याखाली दबले आहेत.

भाजी मंडईनंतर आता राहुल गांधी फर्निचर मार्केटमध्ये; म्हणाले, थोडं शिकण्याचाही प्रयत्न केला…

ईदच्या दिवशीच पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटामध्ये एकूण 52 लोकं ठार झाले असून 100 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली. यामध्ये पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची प्राथमिक माहिती समजत आहे. या घटनेमुळे पाकिस्तानातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार निर्माण झालं आहे. एका वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

भाजपशासित MP मध्ये संतापजनक घटना; रक्ताने माखलेली ‘ती’ अर्धनग्न अवस्थेत भटकत होती पण..,

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मस्तुंगचे डीएसपी नवाज गशकोरी यांचा या स्फोटोत मृत्यू झाला असून, अद्यापर्यंत या स्फोटाची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. याआधी मस्तुंग जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला एक भीषण स्फोट घडवून आणण्यात आला होता. त्यात जमियत उलेमा-ए-इस्लाम फझलचे नेते हाफिज हमदुल्लासह अनेक जण जखमी झाले होते. त्यानंतर महिनाभरात झालेला हा दुसरा भीषण स्फोट आहे.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हल्ले होण्याची मालिका सुरूच आहे. यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मस्तुंगच्या काबू हिल परिसरात दोन वाहनांना लक्ष्य करत स्फोट घडवून आणण्यात आला होता. या घटनेत तीन जण ठार झाले होते, तर सहा जण जखमी झाले होते. तर, यावर्षी जानेवारी महिन्यात क्वेट्टा येथील मशिदीत स्फोट झाला होता ज्यात दहा जण ठार झाले होते. तर अनेक नागरिक जखमी झाले होते. पाकिस्तान दीर्घकाळापासून बलुचिस्तानमधील अतिरेक्यांच्या बंडाशी लढत आहे. या वादातूनच येथे सातत्याने अशाप्रकारेचे भीषण स्फोट घडवून आणले जात असून, यात बळी मात्र सामान्या नागरिकांचा जात आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे.

Tags

follow us