Download App

iphone नंतर Samsung फोनही अमेरिकेत होणार महाग, ट्रम्प यांची मोठी घोषणा

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एक मोठी घोषणा करत अ‍ॅपलनंतर सॅमसंगला मोठा धक्का दिला आहे.

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एक मोठी घोषणा करत अ‍ॅपलनंतर सॅमसंगला मोठा धक्का दिला आहे. ट्रम्प यांनी अ‍ॅपलसह (Apple) सॅमसंग (Samsung) आणि परदेशी स्मार्टफोन कंपन्यांवरही अतिरिक्त आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. या स्मार्टफोनवर टॅरिफ लावण्यात येणार असल्याची घोषणा ट्रम्प यांनी केल्यानंतर अमेरिकेचे शेअर बाजारात (US Stock Markets) मोठी घसरण पाहायला मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  ट्रम्प यांनी अमेरिकन बाजारपेठेतील निष्पक्ष स्पर्धेच्या आधारावर हा निर्णय घेतला असल्याची माहिती देण्यात आली तर ट्रम्प यांच्या निर्णयानंतर देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळेल असं सांगण्यात येत आहे.

अमेरिकेत उत्पादित न होणाऱ्या स्मार्टफोनवर आयातीवर 50% आणि 25% कर आकारला जाईल. 1 जूनपासून हे शुल्क लागू होऊ शकते. अशी माहिती माध्यामांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.

 निर्णय का घेतला?

अ‍ॅपलवर 25% टॅरिफ लावण्यात येत असल्याने अमेरिकेत उत्पादन न करणाऱ्या सॅमसंगसारख्या ब्रँडना वगळणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे भारतात आणि इतर आशियाई देशांमध्ये बनवले जाणारे आणि अमेरिकेत विकले जाणारे सॅमसंग स्मार्टफोन देखील अतिरिक्त शुल्काच्या अधीन असतील असं देखील माध्यमांशी बोलताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

तर दुसरीकडे यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी अ‍ॅपल सीईओ टीम कूकला धमकी देत जर आयफोन अमेरिकेत उत्पादन केले नाही तर त्यांना नवीन शुल्क आकारले जाईल. अशी धमकी दिली आहे.

आजही मुसळधार पाऊस…, पुणे, नाशिक, अहिल्यानगरसह 20 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

जर अ‍ॅपलला भारताचा विकास करायचा असेल तर ती चांगली गोष्ट आहे. जर ते तिथे प्लांट बांधणार असतील तर ती चांगली गोष्ट आहे पण जर ते तिथे संपूर्ण व्यवसाय सुरू करत असतील तर आता त्यांना अमेरिकेत आयफोन विकण्यासाठी किंवा अमेरिकेतच उत्पादन करण्यासाठी शुल्क भरावे लागेल. असं देखील माध्यमांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

follow us