Samsung : सॅमसंग लवकरच नवीन स्मार्टफोन लाँच करणार; एम सीरीजबाबत समोर आली नवीन अपडेट

  • Written By: Published:
Samsung : सॅमसंग लवकरच नवीन स्मार्टफोन लाँच करणार; एम सीरीजबाबत समोर आली नवीन अपडेट

Samsung Smartphone: Galaxy M : सॅमसंग लवकरच त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोन्समध्ये Samsung Galaxy M16 5G आणि Samsung Galaxy M06 5G यांचा समावेश असणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स लवकरच लाँच होणार आहेत. स्मार्टफोनची लाँचिंग डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. (Samsung ) मात्र लवकरच या स्मार्टफोन्सचं लाँचिंग होणार आहे, कारण दोन्ही सॅमसंग फोन बीआयएस सर्टिफिकेशनमध्ये आढळले आहेत. यासोबतच, या दोन्ही स्मार्टफोन्सचे सपोर्ट पेज देखील लाईव्ह झाले आहेत.

आता सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनची माहिती ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अमेझॉनवर देण्यात आली आहे. त्यामुळे Samsung Galaxy M16 5G आणि Samsung Galaxy M06 5G च्या लाँचिंगबाबत आता सर्वचजण प्रचंड उत्सुक आहेत. Samsung Galaxy M16 5G आणि Samsung Galaxy M06 5G असतील, मागील मॉडेल्स Samsung Galaxy M15 5G आणि Samsung Galaxy M05 ची जागा घेतील. दोन्ही सॅमसंग फोनबाबत काही माहिती समोर आली आहे, त्यानुसार अशी शक्यता वर्तवली जात आहे की स्मार्टफोन 30 ते 40 हजार रुपयांच्या किंमतीत असण्याची शक्यता आहे. दोन्ही स्मार्टफोन्सचे काही संभाव्य स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत.

11 हजारात बुक करा मारुतीची ही नवी गाडी

Samsung Galaxy M06 5G चा मॉडेल नंबर SM-M166P/DS आहे, ज्याचे सपोर्ट पेज Samsung च्या वेबसाइटवर लाईव्ह झाले आहे. हा फोन Geekbench वर देखील दिसला आहे. हा सॅमसंग फोन MediaTek Dimensity 6300 SoC, 8GB रॅम आणि Android 14 वर आधारित One UI 6 वर चालेल. या सॅमसंग फोनचे स्पेसिफिकेशन गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लाँच झालेल्या सॅमसंग Samsung Galaxy A16 सारखेच असू शकतात.

Amazon वर लाईव्ह झालेल्या Samsung Galaxy M16 5G च्या टीझरवरून असे दिसून येते की त्याची रचना Galaxy M06 सारखीच असेल, ज्याचा कॅमेरा डिझाइन वेगळे असेल. Galaxy M16 स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 6300 SoC, 6GB पर्यंत RAM असेल आणि तो Android 15 वर आधारित One UI 7 वर चालेल. दोन्ही स्मार्टफोनना 4 वर्षांसाठी ऑपरेटिंग सिस्टम आणि सुरक्षा अपडेट मिळतील. Samsung Galaxy M16 5G आणि Samsung Galaxy M06 5G या दोन्ही स्मार्टफोनचे कॅमेरा मॉड्यूल आणि डिझाईन एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळी असणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या