मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठात भारतीय विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबवले, धक्कादायक कारण…

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठात भारतीय विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबवले, धक्कादायक कारण…

Donald Trump Stops Indian Students Admission To Harvard University : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि हार्वर्ड विद्यापीठ यांच्यातील सुरू (Harvard University) असलेला तणाव थांबण्याचे कोणतेही संकेत दिसत नाहीत. दरम्यान, ट्रम्प सरकारने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. परदेशी विद्यार्थ्यांना सध्या हार्वर्डमध्ये प्रवेश मिळू शकणार नाही. ट्रम्प प्रशासनाने विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबवले आहेत. यामुळे भारत आणि जगातील इतर देशांतील विद्यार्थ्यांच्या समस्या वाढू शकतात. ट्रम्प सरकारच्या या निर्णयाचा परिणाम हार्वर्ड विद्यापीठात शिकत असणाऱ्या सर्व भारतीयांवर (Indian Students) होणार आहे.

न्यू यॉर्क टाईम्सने होमलँड सिक्युरिटी विभागाच्या (DHS) सचिव क्रिस्टी नोएम यांनी हार्वर्ड विद्यापीठाला पाठवलेल्या पत्राचा हवाला देत हे वृत्त दिलंय. हार्वर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थी आणि शैक्षणिक विनिमय प्रवेश कार्यक्रमाची मान्यता तात्काळ (Indian Students Admission To Harvard University) रद्द करण्यात आली आहे, असं नोएमने पत्रात लिहिलंय. हार्वर्ड विद्यापीठ जगभरातील विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. 2025 च्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये ते चौथ्या क्रमांकावर आहे. परंतु अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठ यांच्यातील सुरू असलेल्या तणावामुळे विद्यार्थी आता येथे प्रवेश घेऊ शकणार नाहीत. वास्तविक, ट्रम्प सरकारने हार्वर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे.

अजितदादा हगवणे प्रकरणावर बोलताना गंभीर नव्हते; पत्रकाराचा प्रश्न अन् फडणवीस दादांसाठी बनले ‘ढाल’

788 भारतीय विद्यार्थ्यांचे काय होणार?

हार्वर्डच्या अधिकृत नोंदीनुसार दरवर्षी 500 ते 800 भारतीय विद्यार्थी येथे प्रवेश घेतात. जगभरातून सुमारे 6800 विद्यार्थी येथे येतात. या वर्षी 788 भारतीय विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. आता अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढणार आहेत. परदेशी विद्यार्थ्यांना दुसऱ्या संस्थेत प्रवेश घेण्यास किंवा अमेरिकेतील त्यांचा कायदेशीर दर्जा गमावण्यास सांगण्यात आलंय. त्यामुळे, भारतीय विद्यार्थ्यांना दुसऱ्या संस्थेत प्रवेश घेण्याचा पर्याय असेल. जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांना अमेरिका सोडावी लागू शकते.

हार्वर्डमध्ये शिकणाऱ्या सध्याच्या विद्यार्थ्यांचे काय होणार?

हार्वर्डमध्ये चालू सत्र पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ते त्यांचे पदवीधर शिक्षण पूर्ण करू शकतील. डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी (DHS) च्या सेक्रेटरी क्रिस्टी नोएम यांनी त्यांच्या पत्रात हे नमूद केलंय. त्यांनी लिहिलंय की, ट्रम्प सरकारने केलेला बदल 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून लागू केला जाईल.

हगवणे प्रकरणातील चव्हाणचा इतिहासही छळाचाच; वाचा संताप आणणारे कारनामे

ट्रम्प आणि हार्वर्डमधील तणाव का वाढला?

ट्रम्प आणि हार्वर्ड यांच्यात तणाव आहे. ट्रम्प प्रशासनाला स्वतःच्या इच्छेनुसार विद्यापीठ चालवायचे आहे, परंतु हार्वर्ड यासाठी पूर्णपणे तयार नाही. यहुद्यांविरुद्ध द्वेष रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप हार्वर्डवर करण्यात आला. प्रशासनाने आरोप केला होता की, ज्यू विद्यार्थी आणि प्राध्यापकांविरुद्ध भेदभाव केला जात आहे. आता ट्रम्प सरकारने परदेशी विद्यार्थ्यांबाबत घेतलेल्या निर्णयाकडे विद्यापीठावरील दबाव वाढण्याच्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube