हगवणे प्रकरणातील चव्हाणचा इतिहासही छळाचाच; वाचा संताप आणणारे कारनामे

हगवणे प्रकरणातील चव्हाणचा इतिहासही छळाचाच; वाचा संताप आणणारे कारनामे

Nilesh Chavan Used Spy Camera To Record Wife Offensive Video : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणातील (Vaishnavi Hagawane Case) निलेश चव्हाण याचा इतिहास देखील छळाचाच राहिला आहे. त्याने स्पाय कॅमेऱ्याने पत्नीसोबतच्या शरिरसंबंधांचे व्हिडीओ बनवल्याचा धक्कादायक कारनामा समोर आलाय. हे व्हिडिओ त्याने 2019 मध्ये काढले (Nilesh Chavan) होते, याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला (Pune) होता. यासंबंधी आपण सविस्तर जाणून घेऊ या.

निलेश चव्हाणचं लग्न 2018 मध्ये झालं होतं. त्यानंतर त्याच्या पत्नीला 2019 मध्ये सिलिंग फॅनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचं आढळून आलं होतं. तिने निलेशला विचारलं असता, त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यानंतर पुढच्या महिन्यात (Pune Crime) तिला एसीला देखील काहीतरी संशयास्पद आढळलं, यावेळी देखील त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यानंतर तिने काही दिवसांनी तिने निलेशला लॅपटॉप चेक केला असता, तिल्या त्या दोघांचे शारिरीक संबंधांचे व्हिडिओ असल्याचं दिसून आलं.

शालार्थ आयडी घोटाळा; बोर्डाचे अध्यक्ष चिंतामणी वंजारी SITच्या जाळ्यात…

निलेशचे केवळ स्वत:च्या पत्नीसोबतचे शारिरीक संबंधांचे व्हिडिओ नव्हते, तर इतरही काही महिलांसोबतचे त्याचे असे व्हिडिओ लॅपटॉपमध्ये आढळून आले होते. तिने निलेशला यांसदर्भात विचारणा केली असता त्याने पत्नीला चाकूचा धाक दाखवत घाबरवले. तिच्याकडील दागिने, पैसे हिसकावून घेतले. निलेशच्या पत्नीने ही गोष्ट त्याच्या आईवडिलांना सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी देखील तिलाच दोष देत छळायला सुरूवात केली.

निलेशचा आणि त्याचा वडिलांचा बांधकाम व्यवसाय असून त्यांच्याकडे आर्थिक सधानता आलीय. त्याच्या पत्नीचा सातत्याने छळ होत राहिला. शेवटी कंटाळून तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. 2022 मध्ये तिने वार्जे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मारहाण अन् व्हिडिओ संदर्भात सर्व माहिती सविस्तर दिली. परंतु त्या काळातील वार्जे पोलिसांची भूमिका ही संशयास्पद वाटते. कारण त्यांनी निलेशला अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली होती. पुणे सत्र न्यायालयाने त्याचा तो अर्ज फेटाळला. तरी देखील निलेश चव्हाण याने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला, अखेर त्याला जामीन मिळाला.

Rain Update : रत्नागिरी, रायगडला रेड अलर्ट; मध्य महाराष्ट्रात धो-धो पाऊस बरसणार…

या सर्व घटनेनंतर निलेश चव्हाण विभक्त झाला. त्याचा आणि हगवणे कुटुंबांचा घरोबा होता. तो शशांक हगवणे आणि त्याची बहिण यांचा तो मित्र होता. अनेकदा जेव्हा कस्पटेंनी बोलणी केली, तेव्हा ती निलेश चव्हाणच्याच ऑफिसमध्ये झाली. त्यानंतर वैष्णवीच्या मृत्यूनंतर ते बाळ हगवणे कुटुंबांने निलेश चव्हाणकडे दिले होते. स्पाय कॅमेऱ्याने पत्नीसोबतच्या शरिरसंबंधांचे व्हिडीओ बनवल्याचा गुन्हा वार्जे पोलीस ठाण्यात दाखल होता. त्याच्यावर आता बंदुकीने धाक दाखवत कस्पटे कुटुंबाला धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणात निलेश चव्हाण हा एक महत्वाचा दुवा असून त्याची विकृत प्रवृत्ती समोर आली आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube