Download App

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताननं भारतीय राजदूतांना त्रास देण्यास सुरुवात; वाचा, नक्की काय घडलं?

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताननं भारतीय राजदूतांना त्रास देण्यास सुरुवात केली. इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयालाबाबत अपडेट

  • Written By: Last Updated:

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताननं भारतीय राजदूतांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त (Sindoor) काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यामध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्ताननं प्रतिहल्ल्याचा प्रयत्न केला. पण भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले. पाकिस्ताननं शस्त्रसंधीची विनंती केल्यानं संघर्ष थांबला. भारतानं हल्ले रोखले.

सुत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्ताननं इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालय आणि भारतीय राजदूत यांच्या निवासस्थानांना होत असलेला गॅस आणि पाण्याचा पुरवठा खंडित केला आहे. त्यांच्यापर्यंत वृत्तपत्रं पोहोचणार नाहीत, अशीही व्यवस्थाही करण्यात आली आहे. प्रत्युत्तरादाखल भारतानं नवी दिल्लीत असलेल्या पाकिस्तानी राजदूतांना वृत्तपत्रांचा पुरवठा बंद केला आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून भारतीय राजदूतांवर लक्ष ठेवलं जात आहे.

ट्रम्प यांनी भारतावर जो 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला,पण.. भारतावर परिणाम शून्य..कसा?

इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांच्या घरांमध्ये आणि कार्यालयांमध्ये अनधिकृत प्रवेशांच्या घटना समोर आल्या आहेत. या घटना व्हिएन्ना कन्वेंशन ऑन डिप्लोमॅटिक रिलेशन्सचं उल्लंघन करणाऱ्या आहेत. व्हिएन्ना कन्वेंशन ऑन डिप्लोमॅटिक रिलेशन्समुळे दुतावासातील कर्मचाऱ्यांना सुरक्षेची आणि सन्मानाची खात्री मिळते. पाकिस्तानात सध्या सुरु असलेल्या घडामोडी राजदूतांना घाबरवण्यासाठी केल्या जात असल्याचं स्पष्ट होतं.

सुत्रांच्या माहितीनुसार, भारतीय राजदूतांना गॅस आणि पाणी यासारख्या पायाभूत सुविधा मिळवताना अडचणी येत आहेत. कारण पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी स्थानिक दुकानदारांना या वस्तू भारतीय अधिकाऱ्यांना पुरवू नयेत, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. हेच विक्रेते ऑपरेशन सिंदूरच्या आधी गॅस सिलिंडर आणि बाटली बंद पाण्याचा पुरवठा भारताच्या उच्चायुक्तालयाला करत होते. पण आता ते भारतीय अधिकाऱ्यांना पायाभूत सोयी सहसा पुरवत नाहीत. बऱ्याचदा ते त्यासाठी नकार देतात. याआधी २०१९ मध्ये पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं सर्जिकल स्ट्राईक केला. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ टिपले. त्यावेळीही इस्लामाबादमधील राजदूतांना अशाच प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला होता. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारतीय राजदूतामधील कर्मचाऱ्यांवर सतत दबाव टाकला होता.

follow us