ट्रम्प यांनी भारतावर जो 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला…,पण.. भारतावर परिणाम शून्य..कसा?

India vs America : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे, भारतानं रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करू नये, यासाठी हे डोनाल्ड ट्रम्प (America) यांचं दबावतंत्र असल्याचं बोललं जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील वस्तुंवर आधी 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो, म्हणून अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावण्यात आला.
अमेरिकेकडून भारतावर लावण्यात आलेल्या अतिरिक्त टॅरिफची अंमलबजावणी येत्या 28 ऑगस्टपासून होणार आहे. याचाच अर्थ 28 ऑगस्टपासून भारतावर 50 टक्के टॅरिफ लावणार जाणार आहे. इकनॉमिक टाइम्सच्या एका रिपोर्टसनुसार 2024 मध्ये अमेरिकेनं भारताकडून तब्बल 87 अब्ज डॉलर रुपयांच्या वस्तुंची आयात केली होती. रॉयटर्सच्या एका रिपोर्टनुसार ट्रम्प यांच्या या धमकीला जागतिक बाजारपेठेत फार गांभीर्यानं घेतलं गेलेलं नाहीये. आंतरराष्ट्रीय तेल बाजाराला असा विश्वास आहे की, ट्रम्प यांनी भारतावर जो 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे, याचा फार मोठा परिणाम हा भारतावर होणार नाही.
रेबीजमुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलांना परत आणता येईल का?; भटक्या श्वान प्रेमींना SC ने फटकारलं
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत ट्रम्प यांचं हे रेकॉर्ड राहिलं आहे की ते आपल्या निर्णयावरून लगेचच पलटी देखील मारतात, त्यामुळे ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ लावण्याचा निर्णय अंतिम आहे, असं म्हणणं घाईचं ठरेल असं मत आतंरराष्ट्रीय विषयातील तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादीमीर पुतिन या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे, त्यापूर्वी रशियावर दबाव निर्माण करण्यासाठी ट्रम्प यांनी टॅरिफचा निर्णय घेतला असावा असं देखील बोललं जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
सोमवारी आशियाई बाजारांमध्ये ब्रेंट क्रूड ऑयलची किंमत 65.81 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली आहे. हे दर गेल्या दोन महिन्यातील निचांकी पातळीवर पोहोचले आहेत. तेलाच्या घसरलेल्या या किमतीच हे सांगून जातात की कच्च्या तेलाच्या सप्लाई साखळीवर टॅरिफ धोरणाचा कोणताही परिणाम होणार नाहीये, तज्ज्ञांच्या मते भारत पूर्वीप्रमाणेच रशियाकडून तेलाची खरेदी सुरू ठेवेल किंवा गरज पडली तर इतर कोणत्याही देशाकडून तेल खरेदी केली जाईल. चीन देखील रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करतो, मात्र ट्रम्प चीनवर असा दबाव निर्माण करू शकत नाही, कारण अमेरिका अनेक गोष्टींसाठी चीनवर अवलंबून आहे.