Pakistan Blast: पेशावर हल्ल्यानंतर पाकिस्तानने घेतली तालिबानची मदत

लाहोर : पाकिस्तान (Pakistan) सध्या संकटातून जात आहे. पेशावरमधील मशिदीत नुकत्याच झालेल्या (Bombblast Peshawar) आत्मघाती बॉम्बस्फोटानंतर, पाकिस्तान सरकारने बंदी घातलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) वर लगाम घालण्यासाठी तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. पाकिस्तानच्या मीडियानुसार, शुक्रवारी पेशावरमध्ये सर्वोच्च समितीची बैठक झाली. यामध्ये टीटीपीला रोखण्यासाठी तालिबानचा मुख्य म्होरक्या हिबतुल्ला अखुंदजादा याचा हस्तक्षेप घेण्याचा […]

Untitled Design (3)

Untitled Design (3)

लाहोर : पाकिस्तान (Pakistan) सध्या संकटातून जात आहे. पेशावरमधील मशिदीत नुकत्याच झालेल्या (Bombblast Peshawar) आत्मघाती बॉम्बस्फोटानंतर, पाकिस्तान सरकारने बंदी घातलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) वर लगाम घालण्यासाठी तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

पाकिस्तानच्या मीडियानुसार, शुक्रवारी पेशावरमध्ये सर्वोच्च समितीची बैठक झाली. यामध्ये टीटीपीला रोखण्यासाठी तालिबानचा मुख्य म्होरक्या हिबतुल्ला अखुंदजादा याचा हस्तक्षेप घेण्याचा निर्णय घेण्यात आला. हे प्रकरण सध्याच्या अफगाणिस्तान सरकारकडे ठळकपणे मांडले जाईल. पाकिस्तान यापुढे ‘सीमेपलीकडील’ दहशतवाद सहन करणार नाही, असे या बैठकीत सांगण्यात आले.

त्याचवेळी, टोलो न्यूजनुसार, अफगाणिस्तानच्या अधिकार्‍यांनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण सध्याचे सरकार इतर देशांना विशेषतः पाकिस्तानला अफगाणिस्तानपासून धोका होऊ देणार नाही, असे त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

वास्तविक, पेशावर हल्ल्याची सुरुवातीची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान म्हणजेच टीटीपीने घेतली होती, टीटीपीने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांचा नेता उमर खालिद खुरासानी यांच्या हत्येचा बदला घेतल्याचे म्हटले आहे. असा खुलासा करत टीटीपीने पाकिस्तान सरकारला खुले आव्हान दिले आहे.

तथापि, टीटीपीने नंतर या घटनेपासून स्वतःला दूर केले. त्याचबरोबर आपला सहभाग नाकारत त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला होता. खैबर पख्तुनख्वाचे आयजी मौजम जाह अन्सारी यांनी सांगितले होते की, टीटीपीने या हल्ल्यात सहभाग नाकारला आहे. यानंतर या घटनेत जमातुल अहरारचा हात असल्याचा संशय पोलिसांना होता.

Exit mobile version