Download App

अमेरिकेची झलक! AI नियंत्रित लढाऊ जेटची कॅलिफोर्नियाच्या वाळवंटात घेतली चाचणी

AI नियंत्रित लढाऊ जेट VISTA F16: कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे नियंत्रित F-16 लढाऊ जेटची कॅलिफोर्नियाच्या वाळवंटात चाचणी घेण्यात आली.

AI VISTA F16 : अमेरिकेने एका फायटर जेटची चाचणी घेतली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे नियंत्रित F-16 लढाऊ विमानाची कॅलिफोर्नियाच्या वाळवंटात चाचणी घेण्यात आली. गेल्या महिन्यात अमेरिकेच्या सिनेटच्या विनियोग समितीने संरक्षण समितीसमोर याची घोषणा केली होती. (AI) नवीन फायटर जेटमध्ये भविष्यात युद्धाचा मार्ग बदलण्याची क्षमता असल्याचा दावा अमेरिकन मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

 

चाचणीला विरोध

हे पहिले युद्ध विमान आहे जे मानवरहित असणार आहे. यामध्ये कोणीही माणूस असणार नाही. दरम्यान, या चाचणीनंर 2028 पर्यंत ते लष्कराचा भाग बनले जाईल अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. हे लढाऊ विमान अमेरिकन लष्करासाठी मोठा बदल घडवणारे ठरू शकते. मात्र, त्याची चाचणीला मोठ्या प्रमाणात विरोधही करण्यात आला आहे.

 

नवीन AI फायटर जेट कसे काम करते?

हे फायटर जेट नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. ते चालवण्यासाठी पायलटची गरज नाही. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने चालवले जाते. मात्र, नुकत्याच झालेल्या चाचणीला अमेरिकेचे हवाई दलाचे सचिव फ्रँक केंडल बसले होते. अमेरिकन हवाई दल या फायटर जेटबद्दल आणि त्याच्या वापराबद्दल उत्साहित आहेत. ज्या ठिकाणी मानवी जीवन धोक्यात आहे अशा ठिकाणी याचा वापर केला जाऊ शकतो. अशा प्रकारे शत्रूला धडा शिकवण्यासोबतच युद्ध मोहिमांमध्ये होणारे मानवी मृत्यू रोखले जातील. मात्र, या फायटर जेटमध्ये बसवण्यात आलेल्या स्वायत्त शस्त्र प्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

नवीन एआय फायटर जेट किती हायटेक आहे?

कॅलिफोर्नियातील एडवर्ड एअर फोर्स बेसवरून उड्डाण करणाऱ्या या फायटर जेटच्या वेगानं आवाजाच्या वेगाचा विक्रम मोडल्याचा दावा करण्यात आला आहे. हे चाचणी पायलट जनरेशन फायटर जेट आहे, जे एआय एजंट युद्धभूमीत वापरतील. यूएस एअर फोर्स सेक्रेटरी फ्रँक केंडल यांनी देखील पाहिले आहे की, ते रिअल टाइममध्ये कसे काम करते.

follow us

संबंधित बातम्या