Download App

चीनमध्ये फक्त दोनच तास फोन वापरण्याची परवानगी? कायदाच पारित होणार…

चीनमध्ये 18 वर्षाखालील मुलांसाठी फोन वापरण्याची मर्यादा निश्चित करावी, अशी शिफारस चीनच्या सायबर नियामक संस्थेने शिफारस केली आहे. या संस्थेने 18 वर्षांखालील मुलांसाठी फक्त दोन तास फोन वापरण्याची सूचना केली आहे. या नियम लागू केल्यास मुलांचं आरोग्य निरोगी राहणा असून अपव्यव टाळता येणार असल्याचंही संस्थेने म्हटलं आहे. या निर्णयामुळे इंटरनेट आणि टेक कंपन्यांसाठी तोट्याचा ठरणार आहे.

मी भुजबळांच्या तालमीतला पैलवान, विरोधी पक्षनेते होताच वडेड्डीवार म्हणाले…

संस्थेच्या शिफारशीनंतरच चीनमधील टेक कंपन्यांचे शेअर्स घसरू लागले आहेत. 18 वर्षांखालील मुलांनी रात्री 10 ते सकाळी 6 दरम्यान फोन ठेवू नये, याशिवाय त्यांच्या वापराची मर्यादाही दोन तासांसाठी निश्चित करावी. या मर्यादेत वर्गीकरण सुचविण्यात आले आहे. याअंतर्गत 16 ते 18 वयोगटातील तरुणांना दोन तासांची परवानगी देण्यात यावी. 8 ते 16 वर्षे वयोगटातील मुलांना एक तास आणि त्यापेक्षा लहान मुलांना फक्त 8 मिनिटांसाठी फोन वापरण्याची परवानगी मिळावी, अशी शिफारस सायबर नियामक सस्थेकडून करण्यात आलीयं.

Ahmednagar : गावच्या कारभाऱ्यांनो तयारीला लागा! ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल लवकरच…

मुलांना फोन कमी वापरण्याची परवानगी देण्यासाठी पालक आणि तंत्रज्ञान कंपन्यांवर हे धोरण लागू करण्याची जबाबदारी असणार आहे. या शिफारशीनंतर चिनी टेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण सुरूच आहे. या शिफारशी 2 सप्टेंबर रोजी सार्वजनिक केल्या जातील, परंतु त्याआधीच बाजारातील हालचाली तीव्र झाल्या आहेत. चीनचा हा नियम इंटरनेट कंपन्यांसाठी डोकेदुखी ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे, वापरकर्त्यांची संख्या कमी होईल, मग मागणी देखील कमी होईल आणि नंतर कंपन्यांच्या उत्पादनावर आणि नफ्यावर थेट परिणाम होणार असल्याचं भाकीत तज्ज्ञांनी केलं आहे.

https://letsupp.com/national/three-persons-have-been-detained-on-the-suspicion-raping-a-14-year-old-girl-and-later-killing-and-burning-her-body-in-a-coal-furnace-74802.html

हा नियम लागू करण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागणार असल्याचे टेक कंपन्यांचे म्हणणे आहे. नियमाचे उल्लंघन केल्यास शिक्षेची तरतूद असेल. अशा परिस्थितीत हा नियम कडक असून त्याचे पालन करण्याऐवजी अल्पवयीन मुलांना फोन वापरू न देणेच योग्य ठरेल. चीनमध्ये मुलांच्या फोनच्या व्यसनाबद्दल अनेकदा चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

चीनशिवाय भारत, अमेरिकेसह जगातील अनेक देशांत फोनचा अतिवापर आता समस्या बनला आहे. कमी शारीरिक हालचालींमुळे, मोठ्या संख्येने लोक जीवनशैलीशी संबंधित आजारांना बळी पडत आहेत.

Tags

follow us