Raj-Uddhav Thackeray political Union come? गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राचे राजकारण 360 डिग्रीमध्ये फिरतंय. उद्धव ठाकरे हे काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर गेले अन् महाविकास आघाडी सत्तेत आली. त्यानंतर एकनाथ शिंदे हे शिवसेना फोडून बाहेर पडत भाजपबरोबर जाऊन मुख्यमंत्री झाले. अजितदादा हे राष्ट्रवादी घेऊन भाजपबरोबर गेले. त्यामुळे तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. दोन मोठ्या पक्षांची आघाडी पाहणाऱ्या मराठी जनतेला तीन-तीन पक्षांची युती व महाआघाडी पाहावी लागली. त्यात जनतेने कधी महायुती तर कधी महाविकास आघाडीला निवडणुकीत झटके दिलेत. परंतु पुन्हा आता राज्यातील राजकीय समीकरण हे वेगळ्या वळणावर जाऊ पाहत आहे. टोकाचे मतभेद असलेले राज (Raj Thackeray)व उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे तब्बल 19 वर्षांनंतर मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एकत्र आलेत. वरळीत झालेल्या विजयी मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र आल्याचे राज्याने बघितले. मनसे व शिवसेना-उबाठाची राजकीय परिस्थिती बिकट आहे. राज्याच्या राजकारणात पुन्हा उभारी घेण्यासाठी दोघांना एकीचे बळ हवं आहे. त्यामुळे राज व उद्धव ठाकरे यांच्या राजकीय युतीची घोषणा कधीही होऊ शकते. त्याचा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर तसेच महायुती व महाविकास आघाडीवर कसा परिणाम होईल हेच पाहुया…(Raj-Uddhav Thackeray political Union come? )
मुंबईसह आजूबाजूचे शहरे काबीज करणे?
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यातही मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई व नाशिक या महापालिका राज व उद्धव ठाकरे यांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. मुंबई महानगरपालिकेत तब्बल 25 वर्षे शिवसेनेची सत्ता होती. ही महापालिका देशात सर्वाधिक श्रीमंत महानगरपालिका आहे. या महानगरपालिका दोघांनी ताब्यात आणल्या तरी त्यांची ताकद वाढणार आहेत. तसेही काही वर्षे दोन्ही पक्ष शहरी म्हणून गणले गेले होते. तर तर शहरी भागातील मुस्लिम समाज हा उद्धव ठाकरे यांना मानतो. त्यामुळे ही व्होट बँक ठाकरेंबरोबर जाईल. त्यामुळे शिवसेना-मनसे पक्ष पुन्हा शहरांमध्ये उभारी घेऊ शकतात.
…तर मी आत्मदहन करणार, महादेव मुंडे खून प्रकरणात पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे काय म्हणाल्या?
एकनाथ शिंदे यांना फटका बसणार ?
या भागातील मराठी मतदार हे ठाकरे कुटुंबाला मानतात. सध्या येथील मराठी मतदार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पाठीशी आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत हे दिसून आले आहेत. परंतु ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मताचा टक्का एकनाथ शिंदेंना गमवावा लागणार आहे. कारण मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई भागात शिंदेंचे वर्चस्व आहे. तेथील अनेक माजी नगरसेवक शिंदेंच्या गटात गेलेले आहेत. पण ठाकरेंदी ताकद वाढली तर कार्यकर्ते, पदाधिकारी हे पुन्हा ठाकरेंकडे जाण्यासाठी वेळ लागणार नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कसोटी लागणार आहे. एकनाथ शिंदे यांना महानगरपालिका निवडणुकीत वरचष्मा दाखविता न आल्यास महायुतीमध्ये त्यांचे स्थानही डळमळीत होण्यास वेळ लागणार नाही, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
संभाजीनगरच्या बालगृहातून ९ मुली का पळाल्या होत्या?, धक्कादायक कारण आलं समोर
ठाकरेंची युती भाजपाला आव्हान देणार का?
तसं पाहिलं तर भाजपाने शहरांपासून खेड्यापर्यंत आपली ताकद वाढविलीय. याच जोरावर भाजपने तब्बल 132 आमदार निवडून आणलेले आहेत. भाजपकडे शहरी भागाबरोबर ग्रामीण भागामध्ये मातब्बर नेते आहेत. विधानसभेला भाजपने सर्वाधिक 27 टक्के मते घेतलेली आहेत. तर काँग्रेसची मतेही 13 टक्के इतकी आहेत. तर इतर पक्ष आठ ते दहा टक्क्यांमध्ये आहेत. भाजपला शहरी बरोबर ग्रामीण जनाधार मिळालेला आहे. त्यामुळे मोठ्या शहरांमध्ये ठाकरे बंधुंना शिंदेंबरोबर भाजपसमोर आव्हान निर्माण करावे लागणार आहे.
राष्ट्रवादीबरोबर राहिल तर काँग्रेस बाहेर पडणार ?
राज व उद्धव ठाकरे यांची राजकीय युती झाली तर त्याचा महाविकास आघाडीवर परिणाम होईल. काँग्रेसला ही युती मान्य नसणार आहे. त्याचे वेगवेगळे कारणेही आहेत. एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रश्न आहे तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे भवितव्य अंवलबून आहे. राज ठाकरे यांचे आक्रमक हिंदुत्व आणि उत्तर भारतीयांविरोधातील भूमिका काँग्रेसला मान्य नसणार आहे. तर राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे मुस्लिम समाज राज ठाकरे यांच्याविरोधात असणार आहे. सध्या काँग्रेसकडे मोजकीच व्होट बँक शिल्लक आहे. त्यात मुस्लिम समाज आहे. त्यामुळे काँग्रेसची कोंडी होणार आहे. तर महाविकास आघाडीमधील शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये शहरांमध्ये म्हणावी तशी ताकद नाही. त्यामुळे राष्ट्रवादीला राज ठाकरे यांना बरोबर घेण्याची अडचण राहणार नाही. ठाकरे बंधुंनी शहरी भागावर फोकस केल्यास राष्ट्रवादी ग्रामीण भागावर फोकस करेल. ठाकरे बंधू एकत्र आल्याचा सर्वाधिक फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच बसेल की ? ते दोन्ही ठाकरे बंधुंवर वरचढ ठरतात का ? हे तीन महिन्यात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत दिसून येईल. (Raj-Uddhav Thackeray political Union come? )