…तर मी आत्मदहन करणार, महादेव मुंडे खून प्रकरणात पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे काय म्हणाल्या?

Mahadev Munde Murder : परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांचा दीड वर्षांपूर्वी खून झाला होता. त्यातील आरोपी अद्यापही अटक झालेले नाहीत. येत्या 8 दिवसात आरोपी अटक झाले नाही, तर आत्मदहन करण्याचा इशारा महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिला आहे. (Munde) ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात नवनीत कॉवत यांची भेट घेतली. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.
महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील आरोपी संदर्भात बांगर यांच्याकडे पुरावे आहेत, ते पुरावे घेऊन पोलिसांनी आरोपी अटक करावेत, अशी मागणीच ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली. पोलीस अधीक्षक यांच्यावर आमचा विश्वास असून, त्यांनी या प्रकरणात कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत. तसंच याच प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेटीसाठी वेळ मागितली असल्याचं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी यावेळी सांगितलं.
आकाचा मुलगाही गोत्यात येणार? सुरेश धसांचा महादेव मुंडे खून प्रकरणाला हात
महादेव मुंडे खून प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी उपोषण केले होते. त्यावेळी पोलीस अधीक्षकांनी आरोपी निष्पन्न झाले आहेत. आम्ही ३० तारखेपर्यंत आरोपी अटक करू, असे म्हटले होते. त्यामुळे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी उपोषण मागे घेतले. त्यानंतर बुधवारी
काय म्हणाले होते बाळा बांगर?
बाळा बांगर यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मोठा दावा केला. ते म्हणाले, महादेव मुंडे यांची हत्या केल्यानंतर वाल्मिक कराडच्या टेबलवर त्यांची हाडे आणि रक्त आणून ठेवले होते. यानंतर वाल्मिक कराड याने मारणाऱ्यांना शाबासकी दिली आणि गाड्याही गिफ्ट दिल्या, असा गौप्यस्फोट बांगर यांनी केला आहे.
दरम्यान, बांगर यांच्या आरोपावर बोलताना ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या की, बाळा बांगर जाहीरपणे वक्तव्य करत आहेत. ते सर्व महाराष्ट्राने माध्यमांच्या माध्यमातून पाहिले आहे. त्यानंतर त्यांचा जबाब घेतला गेला नाही. पोलीस अधीक्षक असे का करत आहेत? आरोपींना अटक का करत नाहीत? बांगर दावा करून स्वतः साक्षीदार बनून फिर्याद द्यायला तयार आहेत असंही त्या यावेळी म्हणाल्या. त्यामुळं आता प्रशासन काय निर्णय घेतं हे पाहण महत्वाचं राहणार आहे.