नातवाच्या नोकरीसाठी आजीचं टोकाचं पाऊल; आत्मदहनाचा दिला इशारा…

नातवाच्या नोकरीसाठी आजीचं टोकाचं पाऊल; आत्मदहनाचा दिला इशारा…

अहमदनगर – पोलीस दलात कार्यरत असलेल्या मुलाचे व सेवानिवृत्त सुनेचे कोरोनामध्ये निधन झाले. आपल्या निधन झालेल्या मुलाच्या जागेवर आपल्या नातवाला अनुकंपा तत्वावर (On compassion) हजर करून घ्यावे अशी विनंती एका आजीने केली. मात्र याबाबत पोलील दलाकडून सातत्याने टाळाटाळ करण्यात येते आहे. अनेक वेळा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे, शासनाकडे व महासंचालकाकडे विनंती अर्ज देऊनही कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळं नातवाच्या नोकरीसाठी आता आजीने थेट टोकाचे पाऊल उचलत पोलीस अधीक्षक कार्यालयात (Superintendent of Police ahmednagar) आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. (Grandmother Sulochana Ganpat Kedare will self immolate for her grandsons job)

आत्मदहनाचा इशारा देणाऱ्या या आजीचे नाव सुलोचना गणपत केदारे आहे. त्यांनी आत्मदहनाच्या इशाऱ्या संदर्भात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन दिले.

याबाबत अधिक माहिती अशी, सुलोचना केदारे यांचा पोलीस दलात कार्यरत असलेला मुलगा विठ्ठल केदारे आणि सेवानिवृत्त झालेल्या सुनेचे एप्रिल 2021 मध्ये कोरोनाच्या महामारीत निधन झाले होते. पोलीस अधीक्षक कार्यालयातील आस्थापना विभागातील कर्मचारी व हेड क्लार्क यांच्या सोबत मोठ्या नातवाच्या नोकरी संदर्भात 2018 साली झालेल्या वाद व त्यानंतर झालेल्या सुनावणीत मोठ्या नातवाला पैशाची मागणी करण्यात आली. मात्र, पैशाची मागणी पूर्ण न केल्याने त्याला अनुकंपा तत्वावर हजर करून घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप सुलोचना गणपत केदारे यांनी केला आहे.

‘पुढल्या अधिवेशनापर्यंत थांबा, विरोधी पक्ष फुटलेला असेल’; बावनकुळेंच्या वक्तव्याने खळबळ 

दरम्यान आपला लहान नातू विक्रम विठ्ठल केदारे याचा विनंती अर्ज शासनास पाठविण्यात आलेला आहे. शासनाकडून अहवाल प्राप्त झालेला असून सुद्धा पोलीस दलात त्याला हजर करून घेतले जात नाही. दोन्ही नातू बेरोजगार असल्यामुळे माझा वैद्यकिय खर्च व कुटुंब चालविण्यासाठी काहीही साधन उपलब्ध नाही अशी व्यथा आजीबाई यांनी मांडली आहे.

तसेच आता आपला मुलगा व सून हे हयात राहिले नसल्याने कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी लहान नातू विक्रम केदारे याला पोलीस सेवेत घेण्याची मागणी करण्यात आली. आपल्या मागणीचा योग्य तो विचार न झाल्यास आपण 27 जुलै 2023 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आत्मदहन करणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube