Download App

Ahmednagar : गावच्या कारभाऱ्यांनो तयारीला लागा! ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल लवकरच…

  • Written By: Last Updated:

अहमदनगर – मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील 188 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना (Ward composition) मार्च महिन्यांत जाहीर करण्यात आली होती. आता प्रभाग रचनेनुसार मतदार यादी 10 ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे. त्यावर 10 ते 21 ऑगस्ट दरम्यान हरकती घेण्यात येणार आहेत. त्यानंतर या 188 ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी 25 ऑगस्ट रोजी जारी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. (grampanchayat voter list programe in ahmednagar district election will be held for 188 grampanchayat)

जानेवारी ते एप्रिल या कालावधीत मुदत संपणाऱ्या 78 ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त आहेत. त्यानंतर मुदत संपणाऱ्या 188 ग्रामपंचायतींचा प्रभाग रचनेचा कार्यक्रम मार्च महिन्यांत पूर्ण करण्यात आला. दरम्यान, जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीत 195 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ पूर्ण होत आहे.

Nitin Desai Death : देसाईंचा एन. डी स्टुडिओ महाराष्ट्र सरकार घेणार? उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं अश्वासन 

प्रभाग रचना तयार करण्याचे निर्देश
समोचित आयोगाच्या सूचनेनुसार सात ग्रामपंचायतींचे आरक्षण अपूर्ण आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींना वगळण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित 188 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना तयार करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले होते. आता या 188 ग्रामपंचायतींच्या मतदार यादीचा कार्यक्रम सुरू आहे.

या प्रभाग रचनेबाबत 24 मार्चपर्यंत हरकती मागविण्यात आल्या होत्या. उपविभागीय अधिकाऱ्यांनी उपलब्ध हरकतीवर सुनावणी घेतली. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर आता प्रशासनाने जिल्ह्यातील 188 ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेवरील प्रारुप आरक्षण जाहिर केले होते. यात पहिल्या टप्प्यात 10 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीवर 10 ते 21 तारखेपर्यंत हरकती व सूचना घेण्यात येणार असून त्यानंतर शुक्रवारी (दि. 28) रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

प्रारूप आरक्षण जाहीर झालेल्या ग्रामपंचायती
यापूर्वी आश्वी खुर्द व बुद्रुक, कोळगाव, बोधेगाव, बालमटाकळी, दाह बुद्रुक, उंदिरगाव, उक्कलगाव, मुंगी, देऊळगाव सिद्धी, साडे, पाचेगाव, पिंपरी निर्मळ, विसापूर, शहारटाकळी, दत्तनगर, रास्तापूर, पोहेगाव, धोत्रे, पिंपळगाव कोंझिरा, फत्याबाद, जवखेडे, कनकुरी, जवळके, दुर्गापूर, देवदैठण, वारी, मेहकरी इत्यादी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

 

Tags

follow us