Nitin Desai Death : देसाईंचा एन. डी स्टुडिओ महाराष्ट्र सरकार घेणार? उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं आश्वासन

Nitin Desai Death : देसाईंचा एन. डी स्टुडिओ महाराष्ट्र सरकार घेणार? उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं आश्वासन

Nitin Desai Death : नितीन चंद्रकांत देसाई मृत्यूप्रकरणात एआरसीचा म्हणजे ज्या कंपनीने त्यांना कर्ज दिलं त्या अॅंगलने देखील चौकशी केली जाईल. तसेच या कंपनच्या माध्यामातून जाणीवपूर्वक त्यांचा स्टुडिओ ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जात होता का? त्यांच्यावर जोर जबरदस्ती केली गेली का? कर्ज देताना त्यांची फसवणूक झाली का? हे देखील तपासले जाईल. तर देसाईंचा हा स्टुडिओ एका मराठी कलाकाराचा स्टुडिओ म्हणून तो आठवण म्हणून जपला गेला पाहिजे. त्यासाठी लगेच घोषणा करता येणार नाही मात्र कायदेशीर बाबी तापासून तो स्टुडिओ शासन विकत घेण्याचा प्रयत्न करेल. असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. ( Maharashtra government take over N D Studio said DCM Devendra Fadanvis after Nitin Desai Death)

तुमच्याकडे साधी ग्रामपंचायतही नाही, मागच्या दाराने आमदार झालात; महाजन-खडसे भिडले !

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचे कर्जत येथे निधन झाले. आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे प्रथमदर्शनी बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या सभागृहात नितीन देसाई यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विविध मान्यवरांनी नितीन देसाई यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच या आत्महत्येप्रकरणी देसाईंना कर्ज देणाऱ्या कंपनीची कसून चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी भाजप आमदार प्रसाद लाड आणि आशिष शेलार तसेच अशोक चव्हाण यांनी देखील या मुद्द्यावर चौकशीची मागणी केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितीन देसाई यांच्या मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी केली जाईल असं अश्वासन दिलं.

मेक इन इंडिया’साठी केंद्राचं मोठं पाऊल, लॅपटॉप, टॅबलेटच्या आयातीला लावला ब्रेक…

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

नितीन चंद्रकांत देसाई हे चित्रपटसृष्टील महत्त्वाचं नाव होत. कला दिग्दर्शनात त्यांनी बसवलेलं बस्तान मराठी मानसाला अभिमान वाटावा असं काम त्यांनी केल. त्यांनी मराठी हिंदी चित्रपटच नाही तर राजकीय कार्यक्रमांचे व्यासपीठ देखील ते आकर्षक थीम बनवून द्यायचे. तसेच ते मोठ मोठ्या प्रकल्पांचे सौंदर्यीकरण करण्यासाठी ते काम कारायचे. त्यांनी पंतप्रधान मोदींच्या वाराणसीतील गंगेच्या काही घाटांच्या कल्पना त्यांनीच दिल्या होत्या. दिल्लीतील महाराष्ट्रातील चित्ररथ देखील तेच निर्माण करायचे. त्यामुळे या हरहुन्नरी कलाकराचा मृत्यू अतिशय दुर्दैवी आहे. त्यांच्यावर कर्ज होत. त्यांचा स्टुडिओ त्यासाठी गहाण होता.

एनसीएलटीचा निकालही त्यांच्या विरोधात गेला होता. त्यामुळे त्यांच्या या मृत्यूप्रकरणात एआरसीचा म्हणजे ज्या कंपनीने त्यांना कर्ज दिलं त्या अॅंगलने देखील चौकशी केली जाईल. तसेच या कंपनच्या माध्यामातून जाणीवपूर्वक त्यांचा स्टुडिओ ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जात होता का? त्यांच्यावर जोर जबरदस्ती केली गेली का? कर्ज देताना त्यांची फसवणूक झाली का? हे देखील तपासले जाईल. तर देसाईंचा हा स्टुडिओ एका मराठी कालाकाराचा स्टुडिओ म्हणून तो आठवण म्हणून जपला गेला पाहिजे. त्यासाठी लगेच घोषणा करता येणार नाही मात्र कायदेशीर बाबी तापासून तो स्टुडिओ शासन विकत घेण्याचा प्रयत्न करेल. त्याचे संवर्धन केले जाईल असं अश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube