तुमच्याकडे साधी ग्रामपंचायतही नाही, मागच्या दाराने आमदार झालात; महाजन-खडसे भिडले !

  • Written By: Published:
तुमच्याकडे साधी ग्रामपंचायतही नाही, मागच्या दाराने आमदार झालात; महाजन-खडसे भिडले !

Mahrashtra Monsoon Session : मंत्री गिरीश महाजन व एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यात आता विस्तव जात नाही. जिल्ह्याचे राजकारणात दोघे एकमेंकाना पाण्यात पाहतात. त्यांचे राजकीय भांडणे थेट विधिमंडळातही गाजतात. आज विधानपरिषदेत दोन्ही नेते एकमेंकावर तुटून पडले. दोघांनी एकमेंकाची थेट लायकीच काढली. दोघांमधील भांडणे विकोपाला गेली. दोघांसमोर सभापतीही हतबल झालेल्या दिसल्या. शेवटी काँग्रेसचे भाई जगताप यांनी मध्यस्थी करून दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे दोघेही एेकत नसल्याने भाई जगताप (Bhai Jagtap) संतापले होते. (mahrashtra monsoon session mlas have become through the back door minister girish mahajan eknath khadse collided)

“मलाही त्या खुर्चीवर बसायचं होतं, पण…” : अखेर जयंतरावांच्या पोटातील गोष्ट ओठांवर आलीच!

कापसाला भाव नसल्याचा मुद्दा एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला. कापसाला सात हजार रुपये दर मिळावा म्हणून एकदा गिरीश महाजन हे उपोषणाला बसले होते याची आठवण खडसे यांनी करून दिली. खडसे एवढ्यावरच थांबले नाही. महाजन यांचे मुख्यमंत्री यांच्याजवळचे वजन कमी झाले. आता कोणी विचारत नाही. म्हणून कदाचित पालकमंत्री झाले नाही, असे खडसे म्हणाले.


विरोधी पक्ष नेत्याचा कोट अन् राज्याचा अर्थसंकल्प… : जयंत पाटलांनी सांगितला राणेंच्या दिलदारपणाचा किस्सा

खडसे यांचे हे विधान गिरीश महाजन यांच्या चांगलेच जिव्हारी लागले. तेही संतापले. माझे वजन कुणाजवळ काय आहे हे मला माहिती आहे. तुमचे बघा , १० बारा खात्याचे मंत्री असलेला माणूस आज मागाच्या दारातून येऊन आमदार झाला. जिल्ह्यात कोणी विचारत नाही. आमदारकी गेली, दूध संघ गेला, जिल्हा बँक गेली. आता तर ग्रामपंचायत पण गेली. असा थेट खडसे यांच्यावर महाजनांनी हल्ला चढवला .

हा वाद टोकाला जात असताना सभापती निलम गोऱ्हे यांनी दोन्ही नेत्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. अखेर मी सभागृह काही काल तहकूब करू का ? असा संतप्त सवाल गोऱ्हे यांनी केला. पण दोन्ही नेत्यांचे एकमेंकावरचा आरोप-प्रत्यारोप संपले नाहीत.
अखेर भाई जगताप यांनी दोन्ही नेत्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही मोठे नेते असे भांडणार तर आम्ही काय आदर्श घ्यावा, असा संतापही भाई जगतापांनी व्यक्त केला. अखेर दोन्ही नेते शांत झाले. सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube