America : अमेरिकेमधील ( America ) एका प्रदेशातील शहर असलेल्या होनोलूलूमध्ये एका घरामध्ये एकाच वेळी पाच लोकांचे मृतदेह आढळून आले आहेत. रविवारी ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, या घरामध्ये तीन मुलांसह पती आणि पत्नी अशा संपूर्ण कुटुंबाचे मृतदेह आढळून आले आहेत. त्यांच्यावर चाकूने वार केल्याचे आढळून आले आहे.
गदा अन् मशाल घेऊन एक मर्द दिल्लीत पाठवायचा; ठाकरे गटात येताच चंद्रहार पाटलांची थेट उमेदवारी जाहीर!
या लोकांची हत्या करण्यात आली आहे की, त्यांनी आत्महत्या केली आहे. याचा तपास पोलिस करत आहेत. तसेच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता. या घराचा दरवाजा उघडत नव्हता. परिसरातील लोकांनी सांगितले की, रविवारी सकाळी या घरामधून जोर जोरात भांडणांचे आवाज येत होते. तसेच पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार या कुटुंबातील तीन मुलांना आणि पत्नीला पतीकडून मारण्यात आले आहे. तसेच त्याने नंतर आत्महत्या केली असावी. त्याच्या मृत्यूचं कारण पोलिसांकडून तपासले जात आहे.
शरद पवार गटात प्रवेशाच्या अफवा पण लंकेंच्या चेहऱ्यावर भलतंच टेन्शन!
दरम्यान अमेरिकेमध्ये अशा प्रकारे सामुहिक हत्या आणि आत्महत्या होण्याची ही काही पहिली वेळ नाही. मात्र अशाप्रकारे भयावह सामुहिक हत्या 1999 ला झाली होती. त्यानंतरची ही सर्वात भयावह सामुहिक हत्या असल्याचं सांगितलं जात आहे. 1999 च्या जेरॉक्स हत्येमध्ये ब्रायन कोजी उयेसुगीने त्याच्या पर्यवेक्षकासह सात सहकाऱ्यांची हत्या केली होती.